बंगळूरमधील दगड खाणीत मोठी दुर्घटना
दरड कोसळून ९ मजूरांचा जागीच मृत्यू
अनेक मजूर जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. बंगळूर दक्षिण तालुक्याच्या मदापटना भागातील एका दगड खाणीत गुरुवारी सकाळी एक मोठी दरड कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबून ९ मजूरांचा मृत्यू झाला तर तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकले असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व मजूर बिहारचे असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत दगड फोडण्याचे आणि उत्खननाचे काम सुरू असताना अचानक पहाटेच्या वेळी ही दुर्घटना घडली. तेथे उपस्थित असलेल्या एका कामगाराने सांगितले की, सुमारे १८ मजूर काम करत असताना अचानक सुमारे ४० फूट उंचीवरून त्यांच्यावर एक मोठा दगड कोसळला. या घटनेत मृत्यू झालेले सर्वजण स्टोन क्रशर साइटवर रोजंदारीवर काम करणारे मजूर होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगारा हटवून अनेक जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
या घटनेत मृत्यू झालेले सर्वच्या सर्व ९ मजूर हे बिहारचे होते. त्यांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरड कशी कोसळली आणि खाणीतील सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले गेले होते का? याची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.