CCTV & Chats Expose Fake Physical Assault accusation by nursing student Saam
देश विदेश

आधी शरीरसंबंध ठेवले, बॉयफ्रेंडपासून लव्ह बाईट लपवण्यासाठी तरुणीचा कारनामा, कॅब चालकावरच बलात्काराचा आरोप

CCTV & Chats Expose Fake Physical Assault accusation by nursing student: बंगळुरूतील नर्सिंग विद्यार्थिनीने केलेले सामूहिक बलात्काराचे आरोप खोटे असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट.

Bhagyashree Kamble

बंगळुरूमध्ये एका नर्सिंग विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या आरोपींची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. तपासात असे आढळून आले की, हे सर्व आरोप खोटे आहेत. महिलेनं तिच्या प्रियकरापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी ही कथा रचली आहे. शिवाय, ही महिला कॅब ड्रायव्हरशी सहमतीने भेटल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणावर अधिकतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने आरोप केला होता की, एका कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना सर. एम विश्वेश्वरैया टर्मिलनजवळ घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलीस तपासात नर्सने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि चॅट्स सापडले आहेत. या चॅट्समधून दोघांमधील संबंध सहमतीने झाल्याचे उघड झाले आहे.

वृत्तानुसार, महिलेनं तिच्या प्रियकरापासून तिच्या मानेवरील खुणा लपवण्यासाठी ही कथा रचली होती. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी कॅब ड्रायव्हर पोलीस कोठडीत आहे.

नेमकं प्रकरण काय?

केरळमधील एका नर्सिंग विद्यार्थिनीने २ डिसेंबर रोजी माडीवाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिनं कॅब ड्रायव्हर आणि तिच्या साथीदारांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. पोलिसांनी बानसवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीवरून ड्रायव्हरला अटक केली. आरोपी हा विवाहित असून, २ मुले असल्याची माहिती आहे.

या प्रकरणाचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये विद्यार्थी आणि ड्रायव्हर कॅब सोडून रात्री उशिरा परतताना दिसत आहे. तसेच पोलिसांनी चॅट्स देखील वाचले. यात तरूणीने कॅब ड्रायव्हरला अनेक मेसेज पाठवले असल्याची माहिती आहे. या मेसेजमधून दोघांनी सहमतीने शरीरसंबंध ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर पोलिसांनी नर्सिंग विद्यार्थिनीची चौकशी केली. लव्ह बाईटपासून स्वत:ला वाचवण्यासाठी तिने ही कथा रचली होती, हे उघड झालं.ँ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC केली तरी मिळणार नाहीत ₹ १५००;कारण काय? वाचा सविस्तर

तुमच्या ताटातील मासे गायब होणार? समुद्राचं पाणी होतंय विषारी

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी घरगुती हे सीरम करा ट्राय, आठवड्याभरात दिसेल फरक

गृहयुद्धामुळे हाहाकार, रुग्णालयात एअर स्ट्राईक 30 जणांचा मृत्यू, 70 जखमी

SCROLL FOR NEXT