बंगळुरूमध्ये २७ वर्षीय बॉडीबिल्डरची आत्महत्या
राहत्या घरात गळफास घेत संपवलं आयुष्य
जिममध्ये येणाऱ्या विवाहित महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते
या महिलेच्या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले
बंगळुरूमध्ये २७ वर्षीय बॉडीबिल्डर आणि जिम ट्रेनरने आत्महत्या केली. बंगळुरूच्या नेलमंगला परिसरात ही घटना घडली. शनिवारी रात्री त्याने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. दीपक असं या जिम ट्रेनरचे नाव असून तो राज्यस्तरीय बॉडीबिल्डर होता. त्याने अनेक फिटनेस स्पर्धा जिंकल्या होत्या. सध्या तो एका स्थानिक जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता.
दिपकच्या कुटुंबीयांना आरोप केला आहे की, दोन वर्षांपूर्वी जिममध्ये येणाऱ्या एका विवाहितेसोबत त्याची मैत्री झाली होती. ही महिला त्याला सतत ब्लॅकमेल करत होती आणि त्याला मानसिक त्रास देत होती. त्या महिलेने दिपककडे पैसे आणि प्रॉपर्टीची मागणी केली होती. यामुळे दिपक सतत चिंतेत असायचा. तिने केलेल्या छळामुळे त्याला मानसिक धक्का बसला होता.
त्या महिलेने दीपकच्या बहिणीला मेसेज पाठवून दीपक आत्महत्या करणार आहे असे सांगितले तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यानंतर दिपकच्या कुटुंबीयांनी तात्काळ त्याच्या खोलीकडे धाव घेतली. त्याने दरवाजा आतून बंद केला होता. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता पण तोपर्यंत उशिर झाला होता. दीपकने गळफास घेत आयुष्य संपवले होते. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पाहून घरच्यांना धक्का बसला.
दिपकच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, दीपकने त्या महिलेच्या छळाबद्दल पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर दोघांना समजूत काढून परत पाठवण्यात आले होते. असे असतानाही त्या महिलेने त्याचा छळ सुरूच ठेवला. त्यामुळे दीपकने या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.