Crime AI Photo
देश विदेश

Crime: बायको सतत फोनवर व्यस्त, नवऱ्याला आला राग; मुलं शाळेत असतानाच बायकोला संपवलं

Husband kills wife over phone suspicion: बायको सतत फोनवर व्यस्त असायची. नवऱ्याला आला राग. दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. नवऱ्याने बायकोला संपवलं.

Bhagyashree Kamble

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली आहे. पत्नी सतत फोनवर बोलत असायची. याच कारणावरून पतीच्या मनामध्ये संशयाने घर तयार केलं होतं. दोघांमध्ये या विषयावरून भांडणे होत. अखेर पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. नंतर पतीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. ही धक्कादायक घटना बंगळुरूच्या सीगेहल्ली या भागात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय चंद्रशेखरला ३५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नी सतत फोनवर बोलत असल्याकारणाने पतीला संशय आला होता. हा संशय दिवसेंदिवस वाढत जात होता. या काऱणामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत. मंगळवारीही दोघांमध्ये मोबाईल फोनवरून वाद झाला होता.

रागाच्या भरात नवऱ्याने बायकोचा गळा आवळला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटने दरम्यान, त्यांची दोन्ही मुले शाळेत होती. त्यामुळे दोघांनाही याची कल्पना नव्हती. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी चंद्रशेखरने पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांसमोर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा एक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटक केली.

या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि अटक देखील केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे'. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT