Prajwal Revanna Saam Tv
देश विदेश

Prajwal Revanna: मोठी बातमी! प्रज्वल रेवन्ना यांची पोलीस कोठडीत रवानगी, 6 जूनपर्यंत होणार चौकशी

Karnataka News: लैंगिक छळाच्या आरोपी प्रज्वल रेवन्ना यांना बेंगळुरू न्यायालयाने 6 जूनपर्यंत पोलीस (SIT) कोठडी सुनावली आहे.

Satish Kengar

जनता दल-सेक्युलरचे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना यांना बेंगळुरू न्यायालयाने 6 जूनपर्यंत पोलीस (एसआयटी) कोठडी सुनावली आहे. प्रज्वल यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक त्याची चौकशी करणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर एसआयटीने प्रज्वलला न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रेवन्ना जर्मनीहून बेंगळुरू येथे आल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा एसआयटीने त्यांना अटक केली.

जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचा नातू आणि हसन लोकसभा मतदारसंघातील एनडीएचा उमेदवार प्रज्वल यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावरआतापर्यंत लैंगिक छळाचे 3 गुन्हे दाखल आहेत. प्रज्वल लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या मतदारसंघात मतदान झाल्यानंतर 27 एप्रिल रोजी जर्मनीला गेले होते.

प्रज्वल रेवन्ना गुरुवारी रात्री बेंगळुरू विमानतळावर येताच महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील महिला पोलिसांचे पथक त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची वाट पाहत होते. रेवन्ना जर्मनीहून येथे आल्यानंतर लगेचच एसआयटीने त्यांना अटक करून चौकशी केली.

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी शुक्रवारी सांगितले की, महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोप असलेले प्रज्वल रेवन्ना यांना प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जात आहे.

दरम्यान, प्रज्वल रेवन्ना यांच्या वकिलाने शुक्रवारी सांगितले की, खासदार प्रज्वल यांच्या विरोधात तपास करत असलेल्या एसआयटीला पूर्ण सहकार्य करत आहेत. या प्रकरणी मीडिया ट्रायल न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

SCROLL FOR NEXT