BJP and TMC leaders viral video in forest Saam Tv News
देश विदेश

हायवेनंतर जंगल! TMC काँग्रेस नेता अन् भाजप महिला नेता एकाच कारमध्ये; रात्री नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

BJP and TMC leaders viral video in forest: पश्चिम बंगालमधील जंगलात भाजपच्या महिला नेत्या आणि टीएमसी नेत्याचा कारमध्ये पार्टी करतानाचा व्हिडिओ व्हायरल; ग्रामस्थांनी शूट केलेल्या व्हिडिओमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

काही महिन्यांपूर्वी मनोहर धाकड या राजकीय नेत्याचा हायवेवरील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. आता आणखी एका बड्या राजकीय नेत्याचा महिला नेत्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती आहे. तृणमूल काँग्रेस नेता आणि भाजप महिला नेता रात्रीच्या वेळीस एकाच कारमध्ये होते. कार जंगलाच्या मधोमध उभी असून, स्थानिक रहिवाशांनी दोघांना एकत्र पाहताच खळबळ उडाली. एकानं या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल केला आहे.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये जंगलात दोन नेत्यांच्या दारू पार्टीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, संबंधित महिला नेत्या भाजपच्या दीपा बनिक अधिकारी आहेत, तर पुरुष नेते तृणमूल काँग्रेसचे पंचायती समितीचे अध्यक्ष पंचानन रॉय आहेत. व्हिडिओमध्ये तिसरा एक चालकही दिसत आहे. ही घटना अपलचंद जंगलातून उघडकीस आली. गावकऱ्यांनी तिघांना कारमध्ये दारू पार्टी करताना पकडले. तसेच व्हिडिओही शूट केला.

बराच काळ एकाच ठिकाणी कार उभी असल्याकारणाने स्थानिकांना संशय आला होता. त्यानंतर काही लोक कार जवळ पोहोचले. नंतर आत बसलेल्या लोकांना बाहेर येण्यास सांगितले. यावेळी दोन्ही नेते दारू पार्टी करत असल्याचं समोर आलं. जेव्हा दोघांना पाहिलं, तेव्हा गावकऱ्यांना धक्का बसला. एक भाजप महिला नेता तर, दुसरे तृणमूल काँग्रेसचे नेते होते. गावकऱ्यांनी पाहताच दीपा यांनी हातात असलेला दारूचा ग्लास पुढच्या सीटकडे सरकवला. दोन्ही नेते एकाच कारमध्ये असल्याचं कळताच इतर गावकऱ्यांनी कारभोवती घेराव घातला.

तसेच व्हिडिओही शूट केला आणि व्हायरल केला. या प्रकारावर दीपा म्हणातात, 'मला अडकवण्यासाठी सापळा रचण्यात येत आहे. हा राजकीय कट आहे', असं त्या म्हणाल्या. दरम्यान, टीएमसीने यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सध्या दोन्ही नेत्यांचा दारू पार्टीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT