हृदयद्रावक! चिमुकली समोरच बापाला मारहाण Saam Tv
देश विदेश

हृदयद्रावक! चिमुकली समोरच बापाला मारहाण

उत्तर प्रदेशच्या मधील कानपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षकांचा जमाव एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.

वृत्तसंस्था

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या Uttar Pradesh मधील कानपूर Kanpur चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षकांचा जमाव एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. जमावातील सर्वजण बजरंग दलाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तर या व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अहमद असे सांगण्यात आले आहे. अहमद यांना त्यांच्या लहान मुलीच्याच समोर टोळक्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्या टोळक्याने त्यांना बळजबरीने 'जय श्रीराम'च्या घोषणाही द्यायला लावल्या.

हे देखील पहा-

दरम्यान, अहमद यांची लहान मुलगीही हा सर्व प्रकार सुरु असताना त्यांच्यासोबतच होती. आपल्या वडिलांना त्या लोकांपासून वाचवण्यासाठी तिची बरीच गयावया सुरु होती. मात्र, वडिलांना बिलगून घट्ट धरून रडत असणाऱ्या त्या चिमुरडीची कोणालाही त्यावेळी दया आली नाही. आधी टोळक्याने मारहाण केली आणि नंतर अहमद यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस त्या ठिकाणी आले तरीही अहमद यांना त्या टोळक्याकडून मारहाण सुरुच होती.

नेमकं काय घडले?

धर्मांतर करण्यासाठी एका दलित महिलेवर दबाव Conversion आणल्या असल्याच्या आरोपावरून बजरंग दलाच्या Bajrang Dal काही कार्यकर्त्यांनी अहमद यांना मारहाण केली. कानपूर येथील बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आपल्या शेजारी राहणाऱ्या एका दलित महिलेवर बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी दबाव अहमद यांनी आणला होता, असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे यावर म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दूध नाही तर विष पिताय! उकळताना दूध झालं अक्षरशः रबरासारखं

Ladki Bahin Yojana : दिवाळी झाली, भाऊबीजेलाही नाही; लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? आली नवी अपडेट

Chandrashekhar Bawnkule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही; बावनकुळे यांची खोचक टीका

Kalyan News: कल्याणमध्ये 4 धाडसी तरूणांमुळे मोठा अनर्थ टळला, ऐन दिवाळीत आलं होतं मोठं संकट

Maharashtra Live News Update: पुणे शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT