स्पुतनिक लाइट लस सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत

भारताला लवकरच कोरोनाविरूद्धच्या लढाईत आणखी एक शस्त्र मिळणार आहे. माहितीनुसार, कोरोनाची रशियन लस, भारतात स्पुतनिक लाईट लस सप्टेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकते.
स्पुतनिक लाइट लस सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत
स्पुतनिक लाइट लस सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; जाणून घ्या किंमतSaam Tv
Published On

नवी दिल्ली: भारताला लवकरच कोरोनाविरूद्धच्या लढाईत आणखी एक शस्त्र मिळणार आहे. माहितीनुसार, कोरोनाची रशियन लस, भारतात स्पुतनिक लाईट लस Sputnik Light Vaccine in India सप्टेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकते. या सिंगल डोस Single Dose लसीची किंमत 750 रुपये असेल. कंपनीने आपत्कालीन वापरासाठी अर्जही केला आहे. स्पुतनिक व्ही रशियन लस भारतात आधीच वापरली जात आहे.

हे देखील पहा-

एका संकेतस्थळाच्या अहवालानुसार, पॅनेशिया बायोटेकने Panacea Biotec स्पुतनिक लाईटच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी एक डोजियर सादर केला आहे. स्पुतनिक लाइट रशियाच्या गामालेया इंस्टीट्यूटने Gamaleya Research Institute of Epidemiology and Microbiology विकसित केला आहे. जुलैमध्ये, पॅनेशिया बायोटेकने स्पुतनिक व्ही लस तयार करण्यासाठी परवाना जाहीर केला.

स्पुतनिक लाइट लस सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत
नाशकात 15 ऑगस्टपासून पुन्हा हेल्मेटसक्ती; पण...

कोरोना विषाणूविरूद्ध स्पुतनिक लाईट किती प्रभावी आहे?

मे महिन्यात रशियाने स्पुतनिक लाईटच्या आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली. रशियन शास्त्रज्ञांनी ही लस कोरोना विषाणूविरूद्ध 80% पर्यंत प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

J&J सिंगल डोस लसला मंजुरी;

यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी भारत सरकारने जॉनसन अँड जॉन्सन या अमेरिकन कंपनीच्या सिंगल-डोस कोरोना लसीसाठी आणीबाणी वापरासाठी मंजुरी दिली. जॉन्सन अँड जॉन्सनची johnson and johnson vaccine ही लस लवकरच भारतीय बाजारात येण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com