Bar Council, Supreme Court  SAAM TV
देश विदेश

सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढवण्याचा ठराव मंजूर

भारतीय बार कौन्सिलची गेल्या आठवड्यात संयुक्त बैठक झाली.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : भारतीय बार कौन्सिल (BCI) च्या गेल्या आठवड्यात झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते घटना दुरुस्ती आणि सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय वाढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

"घटनेत तात्काळ दुरुस्ती करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करावे आणि सर्वोच्च न्यायालयातील(Supreme Court) न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६७ वर्षे करावे," असे बीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

ठरावावर तात्काळ कारवाई करण्यासाठी ठरावाची प्रत भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री यांना कळवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे बीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या संयुक्त बैठकीत विविध कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करण्याचा प्रस्ताव संसदेला देण्याचा ठरावही करण्यात आला आहे, जेणेकरून अनुभवी वकिलांनाही विविध आयोग आणि इतर ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्त करता येईल.

गेल्या आठवड्यात झालेल्या सर्व राज्य बार कौन्सिल, हायकोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त बैठकीत उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

दरम्यान, विविध आयोग आणि इतर मंचांचे अध्यक्ष म्हणून अनुभवी वकिलांची नियुक्ती करता यावी यासाठी विविध कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार संसदेकडे करण्याचा प्रस्तावही या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prarthana Behere Mangasultra Designs: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या मंगळसूत्राची क्रेझ कायम, हे आहेत 5 ट्रेडिंग पॅटर्न

Akola : दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय; डोकं सटकलं, बॉयफ्रेंडनं केली समलिंगी पार्टनरची हत्या

Maharashtra Live News Update: ताम्हिणी घाटात खासगी बसला अपघात; २० जण जखमी

Insomnia Cancer Patients: कॅन्सरच्या रुग्णांना झोप का लागत नाही? डॉक्टरांनी सांगितली 'ही' कारणं

Pink Blouse Designs: गुलाबी रंगाच्या ब्लाऊजचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, सिंपल साडीतही तुम्हीच उठून दिसाल

SCROLL FOR NEXT