Bank Holidays: आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, इथे तपासा सुट्ट्यांची यादी Saam Tv
देश विदेश

Bank Holidays: आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, इथे तपासा सुट्ट्यांची यादी

आजपासून पुढील ५ दिवस देशभरात बँका बंद राहणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : आजपासून पुढील ५ दिवस देशभरात बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Reserve Bank of India -RBI जारी केलेल्या यादीनुसार या सुट्ट्या दिल्या जातात. यामुळे तुमचे बँकेचे कोणतेही काम असेल, तर ते पुढील आठवड्याकरिता स्थगित करावे लागणार आहे. दरम्यान, आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार, यामध्ये काही दिवस असे आहेत.

ज्यावेळी काही विशिष्ट भागात सण किंवा जयंती दिनानिमित्त बँका चालू राहणार नाही. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार प्रत्येक राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. या आरबीआयच्याच्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकांच्या सुट्ट्यांची मोठी यादी आहे. आरबीआयने जारी करण्यात आलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामे उरकून घ्यावेत.

हे देखील पहा-

यादीच्या मदतीनुसार तुम्ही परत शाखेत जाणे, कामात अडकणे यासारख्या समस्या टाळू शकता. नोव्हेंबर महिन्यात सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. यानंतर, ३ नोव्हेंबरला म्हणजेच आज नरक चतुर्दशी दिवशी केवळ बंगळुरूमध्ये बँकेत कोणतेही सामान्य कामकाज होणार नाही. तर ७, १४, २१ आणि २८ नोव्हेंबरला रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असणार आहे. याचबरोबर १३ नोव्हेंबर दिवशी दुसरा शनिवार आणि २७ नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्यामुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत.

३ नोव्हेंबर - बुधवार - नरक चतुर्दशीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहणार आहेत.

४ नोव्हेंबर - गुरुवार - आगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोची, मुंबई, नागपूर, लखनौ या शहरांमध्ये दिवाळी आणि काली पूजनामुळे बँका बंद राहणार आहेत.

५ नोव्हेंबर – शुक्रवार – गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, डेहराडून या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.

६ नोव्हेंबर- शनिवार- भाई दूजची गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे.

७ नोव्हेंबर - रविवारची सुट्टी असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली? रात्री किती वाजता सुरु होणार सामना?

SCROLL FOR NEXT