बांगलादेशमध्ये हिंसाचाराची धग वाढलेली असतानाच एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लक्ष्मीपूर सदर उपजिल्ह्यात जमावाने घराला आग लावल्याने बीएनपी नेत्याच्या सात वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भाबानिगंज युनियन बीएनपीचे सहाय्यक संघटन सचिव आणि व्यावसायिक बेलाल हुसेन यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. द डेली स्टारच्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी घराची दोन्ही दारे बाहेरून कडी लावून पेट्रोल ओतत घराला आग लावली.
या आगीत बेलाल हुसेन यांची सात वर्षांची मुलगी आयेशा हुसैन हिचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन मुली सलमा आक्तर (१६) आणि सामिया आक्तर (१४) यांच्यासह बेलाल हुसेन हे गंभीर जखमी झाले आहेत.
बेलाल यांच्या आई हाजेरा बेगम यांनी सांगितले की,जेवणानंतर आम्ही झोपलो होतो. रात्री अचानक आग लागल्याचे दिसले. त्यावेळी आम्ही घराबाहेर पळून गेले, पण दोन्ही दारे बाहेरून बंद होती. मुलाने कसेबसे दार तोडून बाहेर पडत जीव वाचवला. त्याची पत्नी चार महिन्यांच्या बाळासह आणि सहा वर्षांच्या मुलासह बाहेर आली. मात्र तीन मुली खोलीत अडकले होते.
आगीमधून दोन मुलींना गंभीर अवस्थेत वाचवण्यात आले, मात्र आयेशाचा मृत्यू झाला.
लक्ष्मीपूर सदर रुग्णालयाचे आरएमओ डॉ. अरूप पाल यांनी सांगितले की, बेलाल हुसेन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही मुलींना गंभीर भाजल्याने ढाका येथील राष्ट्रीय बर्न अँड प्लास्टिक सर्जरी संस्थेत हलवण्यात आले आहे. त्या दोघींचे सुमारे ५० ते ६० टक्के शरीर भाजले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.