Bangladesh Accident News: सिलहट-ढाका महामार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक, 13 जणांचा मृत्यू, 9 जखमी

बांग्लादेशमधील सिलहटजवळील नजीर बाजाराच्या भागात बुधवारी सिलहट-ढाका महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.
Accident News
Accident NewsSaam Tv
Published On

Bangladesh News: बांग्लादेशमधील सिलहटजवळील नजीर बाजाराच्या भागात बुधवारी सिलहट-ढाका महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, सिलहट-ढाका महामार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेल्या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात हारिस मियां, सौरव, साधु मियां, तैयफ नूर, सागर, राशिद मियां, दुलाल मियां, बादशाह मियां आणि वाहिद अली यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील चार जणांची ओळख अद्याप झालेली नाही.

Accident News
Odisha train tragedy: ओडिशा रेस्क्यू ऑपरेशननंतर NDRF जवानांना मानसिक धक्का; पाण्याच्या जागी दिसतंय रक्त, अन्नावरची भावना उडाली

नेमका अपघात कसा झाला?

बांग्लादेशमधील दक्षिण सूरमा पोलीस स्टेशनचे प्रभारी शमसुहोद्दा यांनी सांगितले की, पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रकने २०-२२ मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. या गंभीर अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली. या लोकांनी जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल केले. सिलहट उस्मानी मेडिकल कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सिलहट-ढाका महामार्गावर तीन तास वाहतूक बंद होती. यामुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वाहतूक कोंडी कमी केली. मार्च महिन्यात देखील बांग्लादेशमध्ये भीषण अपघात झाला होता. एक भरधाव बस दरीत कोसळल्याने १९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर ३० जण जखमी झाले होते. तर दोघांचा प्रकृतीत सुधारणा न झाल्याने मृत्यू झाला होता.

Accident News
Odisha Train Collision: अंगावर जखमांचे व्रण नाही, कुठलीही गंभीर दुखापत नाही; मग ४० प्रवाशांच्या मृत्यूचं कारण काय?

ओडिशात तीन ट्रेनचा भीषण अपघात

दरम्यान, भारतातील ओडिशात काही दिवसांपूर्वी रेल्वेचा भीषण अपघात झाला. तीन रेल्वेच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने संपूर्ण शोककळा पसरली होती.

अपघातानंतर एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने मदत करण्यास सुरुवात केली. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारने या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत देखील जाहीर केली आहे. या अपघातामुळे अनेकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com