PM Modi Chair Meeting On Bangladesh 
देश विदेश

PM Modi Meeting On Bangladesh: बांगलादेशमध्ये अस्थिर परिस्थिती; पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू

PM Modi Chair Meeting On Bangladesh: बांगलादेशाच्या अस्थिर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बैठकीला उपस्थित आहेत.

Bharat Jadhav

बांगलादेशात राजकीय अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झालीय. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण कोटा योजनेबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. त्यानंतर तेथे विदारक परिस्थिती निर्माण झालीय.आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाची ताबा घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना ह्या बहिणीसोबत देश सोडून भारतात आल्या आहेत.

बांगलादेशातील परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यापार्श्वभूमीवर बैठक सुरू झालीय. बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अजित डोवाल हेही उपस्थित आहेत. शेजारी देशामधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर मेघालयने बांगलादेशच्या सीमेवर रात्रीचा कर्फ्यू लागू केलाय. राज्याचे मुख्यमंत्री संगमा यांनी याची माहिती दिलीय.

दरम्यान, बांगलादेशात विदारक स्थिती निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांना हिंडन एअरबेसच्या सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. बांगलादेशात आरक्षणविरोधी निदर्शने आणि हिंसक संघर्षांदरम्यान तेथे सत्तापालट झाला. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडला. त्यानंतर दूरचित्रवाणीवर संबोधित करताना लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी लष्कर काळजीवाहू सरकार स्थापन करणार असल्याचं सांगितलं.

देशात होणारे आंदोलनाला हिसंक वळण लागल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना ह्यांनी बहीण शेख रेहानासह देश सोडला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, रविवारी बांगलादेशच्या रस्त्यांवर भीषण चकमकी सुरू झाल्या. यात किमान ३०० जणांचा मृ्तयू झालाय. मात्र, यासंदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. यासर्व परिस्थितीवर भारत सरकार नजर ठेवून असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे.

बांगलादेशात हिंसाचार वाढल्यानंतर इंडिगोने तत्काळ प्रभावाने ढाका आणि तेथून नियोजित उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोची दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथून ढाक्यासाठी अनेक उड्डाणे होत असतात. तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंडन एअरबेसवर NSA अजित डोवाल यांच्याशी बांगलादेशची सद्यस्थिती आणि भविष्यातील कृती यावर चर्चा केली. सध्याच्या घडामोडी पाहता भारतीय हवाई दलाने पूर्वेकडील प्रत्येक क्षेत्रात आपल्या जवानांना सतर्क ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT