Bangladesh News Saam Tv
देश विदेश

Bangladesh News: साडी ब्लाऊज, खुर्ची अन्... भांडे; आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातून काय काय पळवलं? बघा VIDEO

Bangladesh Protesters Stolen Blanket Chair AC Video: बांगलादेशातील पंतप्रधानांच्या घरातून चोरी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खुर्ची, गादी, एसी आंदोलक पळवत असल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : बांगलादेशमधील हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये आंदोलकांनी ढाका येथील पंतप्रधान शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश केल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की आंदोलकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानात तोडफोड केलीय. तर त्यांच्या घरातील वस्तू ते घेवून पळून जात आहेत. आंदोलक खुर्ची, गादी, एसी घेवून जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

बांगलादेशातील पंतप्रधानांच्या घरातून चोरी

या हिंसाचारात जवळपास १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. बांगलादेशातील हजारो आंदोलकांनी सोमवारी ५ ऑगस्ट रोजी राजधानी ढाका शहरातील शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानाची लूट आणि तोडफोड (Bangladesh Protesters) केली. दरम्यान शेख हसीना त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देवून भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी कोटा प्रणाली तसेच हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीचा निषेध करत आंदोलक रस्त्यावर उतरले होते.

व्हिडिओ व्हायरल

हसीना यांचे वैयक्तिक तसेच घरातील सामान पळवून नेता मोठा जमाव रस्त्यावर दिसत (Sheikh Hasinas House Looted Video) आहेत. आंदोलकांनी हसीना यांच्या निवासस्थानी असलेल्या सामानाची तोडफोड केलीय. तर ते शेख हसीना यांचे कपडे, साड्यांसोबतच सोफा, खुर्ची, फॅन अशा शेख हसीना यांच्या घरातील वस्तू डोक्यावर उचलून नेताना दिसत (Bangladesh News) आहेत. यावेळी परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालीय, तसंच मालमत्तेचं देखील नुकसान झालंय. रस्त्यावरील मोठ्या अनियंत्रित जमावाला शांत करणं, सुरक्षारक्षकांच्या आवाक्याबाहेर होतं.

तणावपूर्ण परिस्थिती

बांगलादेशमध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) २००९ पासून सत्तेत आहेत. परंतु, जानेवारीत झालेल्या निवडणुकीत दंगल घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जात आहे. मागील महिन्यात देखील लाखो लोकं रस्त्यावर उतरले होते. बांगलादेशमध्ये अशांतता वाढत असल्यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर देशावर बांगलादेशच्या लष्कराचे नियंत्रण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT