Hindu Man Brutally Killed In Bangladesh Saam Tv
देश विदेश

Bangladesh: बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या, जमावाकडून आधी धारदार शस्त्राने वार; नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

Hindu Man Brutally Killed In Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंदू व्यक्तीची जमावाने हत्या केली. या व्यक्तीवर जमावाने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

Priya More

Summary -

  • बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ

  • शरीयतपूर जिल्ह्यात हिंदू औषध विक्रेत्याची निर्घृण हत्या

  • जमावाने धारदार शस्त्राने हल्ला करून जिवंत जाळले

  • याआधीही हिंदूंवर जमावाकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. याठिकाणी आणखी एका हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जमावाने एका हिंदू व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. खोकोन दास ( ५० वर्षे) हे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. त्यानंतर जमावाने खोकोन दास यांना जिवंत जाळले. ही घटना ३१ डिसेंबरला म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंधघ्येला शरीयतपूर जिल्ह्यात घडली. या हल्ल्यात खोकोन दास यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शरीयतपूर जिल्ह्यात हिंदू औषध विक्रेता खोकोन दासवर जमावाकडून हल्ला करण्यात आला. दास आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी काही जणांनी धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोर ऐवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी दास यांच्या शरीरावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याआधी बांगलादेशमध्ये १८ डिसेंबर २०२५ रोजी मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे हिंदू कामगार दिपू चंद्र दास याच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केला होता. त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर भरचौकात एका झाडाला लटकवून त्याला जाळून टाकण्यात आले होते. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना अटक केली. या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

दरम्यान, २८ डिसेंबर रोजी पिरोजपूर जिल्ह्यातील डुमरितला गावात हिंदू कुटुंबांच्या घरांना आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चट्टोग्रामच्या राओजन भागात अनेक हिंदू घरांना लक्ष्य करण्यात आले होते. याठिकाणी अनेक हिंदू कुटुंबीयांच्या घराचे दरवाजे बंद करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण सुदैवाने या घटनेत सर्वजण बचावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस ड्रायव्हर अन् शिक्षिकेच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; थर्टी फर्स्टच्या दिवशी घेतला टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

Maharashtra Politics: बंडखोराची कमाल, AB फॉर्मची झेरॉक्स, बंडखोरानं पक्षासोबत आयोगालाही गंडवलं

Maharashtra Live News Update : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नवीन ट्विस्ट

नवरा भाजपला नडला, बायकोनं संसार मोडला? नवरा करी बंडखोरी, बायको गेली माहेरी

6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

SCROLL FOR NEXT