Bangladesh Crime Saam Tv
देश विदेश

Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाची गोळ्या झाडून हत्या, ४२ दिवसांतील १३ वी घटना

Bangladesh Crime: बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार आणि त्यांच्या हत्येच्या घटना सुरूच आहेत. आणखी एका हिंदू तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही ४२ दिवसांमधील १३ वी घटना आहे.

Priya More

Summary -

  • बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या

  • फेनी जिल्ह्यात हिंदू तरुणाची गोळ्या झाडून हत्या

  • गेल्या ४२ दिवसांत १३ हिंदूंची हत्या

  • समीर दास या रिक्षाचालकाची निर्घृण हत्या

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाही. या अशांततेदरम्यान बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बांगलादेशच्या फेनी जिल्ह्यातील दागोनभुईयान भागात ही घटना घडली. गेल्या ४२ दिवसांतील ही १३ व्या हिंदू व्यक्तीची हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे बांगलादेशमध्ये हिंसाचार पसरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर दास (२८ वर्षे) असं मृत हिंदू तरुणाचे नाव होते. समीर दास हा ऑटो रिक्षा चालक म्हणून काम करत होता. ११ जानेवारीच्या रात्री चितगाव येथील दागनभुईयान येथे त्याची चाकूने वार आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी रिक्षा घेऊन फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात ही घटना दरोडा आणि हत्येची असल्याचे दिसून येत आहे. पोलिस तपास करत आहेत अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर दास हा दगनभुआच्या मातुभुईया युनियनमधील रामानंदपूर गावचा रहिवासी होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी रात्री समीर घरी परत आला नाही तेव्हा कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. पण तो कुठेच भेटला नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांना उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह आढळून आला. समीरची हत्या हा पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या २५ दिवसांत बांगलादेशात अनेक हिंदू तरुणांची हत्या करण्यात आली आहे. १८ डिसेंबर रोजी मयमनसिंग जिल्ह्यातील भालुका भागात जमावाने दिपू चंद्र दास यांची हत्या केली. त्यानंतर सहा दिवसांनी २५ डिसेंबर रोजी अमृत मंडल या आणखी एका हिंदू तरुणाचीही हत्या करण्यात आली. बांगलादेशमध्ये गेल्या ४२ दिवसामध्ये १३ हिंदू व्यक्तींची हत्या करण्यात आली. सुमारे १७ कोटी लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बहुल बांगलादेशमधील परिस्थिती २०२४ पासून बिघडत चालली आहे. हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष आणि गटनेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

भाऊ झाला वैरी! किरकोळ कारणावरून झालं भांडण अन् तरूणानं भावाच्या मानेवर कोयत्याने केले सपासप वार

Shocking : धक्कादायक! आधारकार्ड, पॅनकार्डसह सरकारी डेटा चोरीला, देशांतर्गत टोळीचा रॅकेटचा पर्दाफाश

Bigg Boss Marathi 6: करण पडला प्राजक्ताच्या प्रेमात? बिग बॉसने स्वत: दोघांची मस्करी करत केली पोलखोल

SCROLL FOR NEXT