Fear and destruction prevail as Hindu temples and homes are attacked amid rising violence in Bangladesh. Saam Tv
देश विदेश

बांग्लादेशात हिंदूंवरअत्याचार, मंदिरं जाळली, घरं तोडली, 1 कोटी 31 लाख हिंदूंचं अस्तित्व धोक्यात

Bangladesh in Turmoil: बांग्लादेशात हिंदूंविरोधात हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. देशातील 1 कोटी 31 लाख हिंदूंचं अस्तित्व धोक्यात आलंय. घरांना आग लावणं, धार्मिक स्थळांवर हल्ले, मारहाण आणि हत्या अशा घटनांमुळे हिंदू समाजात दहशत पसरलीय. काय आहे या हल्ल्यांमागचं कारण? बांग्लादेश पुन्हा एकदा हिंसाचार का उसळलाय.

Omkar Sonawane

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पळवून लावल्यानंतर बांग्लादेशातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीय. याठिकाणी दिवसेंदिवस हिंदूंविरोधी वातवरण बनत चाललंय. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा बांग्लादेशात हिंसाचार वाढलाय. मोहम्मद युनूस सरकारवर कट्टरपंथीयांना संरक्षण देत असून बांग्लादेशात हिंदू भगाओ मोहीम हाती घेण्यात आल्याचा आरोप केला जातोय. युनूस सरकारनं सत्तेत येताना विकास, बदल आणि शांततेचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचा दावा करण्यात येतोय.

बांग्लादेशात हिंदूंना उघड उघड धमक्या दिल्या जात आहेत. हिंदूची मंदिरं जाळण्यात येतायेत. घरांवर हल्ले केले जातायेत. दीपू चंद्र दास या युवकाला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकारही समोर आलंय. परिस्थिती इतकी भयानक आहे की लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं जातंय. बांग्लादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी आवाज आठवलाय. तस्लीमा नसरीन यांनी युनूस सरकारला थेट चार सवाल विचारले आहेत.

तस्लिमा नसरीन यांचे सरकारला सवाल

हिंदूविरोधी कट्टरपंथीयांवर कारवाई होणार का?

पीडित हिंदूंना भरपाई दिली जाणार का?

इतक्या गंभीर घटनांकडे दुर्लक्ष का केल जातंय?

हिंदूंना अशाच प्रकारे जिवंत जळू दिलं जाणार का?

बांग्लादेशातल्या हिंसाचाराची सुरुवात उस्मान हादी यांच्या हत्येनंतर झाल्याचं सांगितलं जातंय. या हत्येमागेही राजकीय कट असल्याचा आरोप होतोय. आगामी सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यासाठी युनूस सरकारमधील एका गटानेच हत्येचा कट रचला असा आरोप उस्मान हादीच्या भावाने केलाय. असं असलं तरी बांग्लादेशातली सध्याची परिस्थिती पाहाता इथं हिंदू सुरक्षित नाहीत हेच अधोरेखित होतंय. यावर आता भारत सरकार काय भूमिका घेतं हे पाहणंही तितकच महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT