Bangladesh Plane Crash update Saam tv
देश विदेश

Bangladesh Plane Crash : अहमदाबादची पुनरावृत्ती; टेकऑफनंतर काही क्षणात विमान शाळेवर कोसळलं, परिसरातील धक्कादायक VIDEO समोर

Bangladesh Plane Crash update : अहमदाबादची पुनरावृत्ती बांगलादेशमध्ये पाहायला मिळाली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात विमान शाळेवर कोसळलं.

Vishal Gangurde

बांगलादेशाच्या वायू दलाचं एफ-७ ट्रेनर विमान आज दुपारी दीड वाजता (भारतीय वेळ १ वाजता) राजधानी ढाकाच्या उत्तरा क्षेत्राच्या दियाबारी भागात कोसळलं. विमान हे माइलस्टोन शाळा आणि कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं. विमान कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमानाचं टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणात कोसळल्याची माहिती मिळाली आहे. बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एफ-७ ट्रेनर विमानाने दुपारी १ वाजून ६ मिनिटाला उड्डाण घेतलं. त्यानंतर अवघ्या २४ मिनिटात विमान कोसळल्याची घटना घडली आहे. विमान भारतीय वेळेनुसार एक वाजून ३० मिनिटाला कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत नेमकं किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एफ-७ हे चिनी विमान आहे.

एपीच्या रिपोर्टनुसार, सैन्य दल आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशाच्या हवाईचं दलाचं विमान ढाका परिसरात एका शाळेवर कोसळलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची मिळाली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच सैन्य दल, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे ८ पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरु केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुपारी १.१८ वाजता माइलस्टोन शाळा आणि कॉलेजवर विमान कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ३ पथकांनी तातडीने मदतीसाठी पोहोचले. तर इतर दोन पथक रस्त्यावर जखमी झालेल्यांना लोकांच्या मदतीला धावले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये माइलस्टोन कॉलेज परिसरात धुरांचे लोट पसरले. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र, विमान दुर्घटनेमुळे परिसरात हाहाकार माजला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT