Bangalore Chor Bazaar: भारतात दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक येतात. यातच अनेक लोक त्यांना पाहुणे समजून त्यांना मदत करतात. तर अनेक लोक त्यांना लुटतात आणि त्यांच्याशी गैरवर्तन करतात. असाच एक प्रकार बेंगळुरूमधील चोर बाजार (Bangalore Sunday Bazaar) येथे घडला आहे.
येथे शॉपिंग आणि ब्लॉग रेकॉर्ड करण्यासाठी आलेल्या एका डच यूट्यूबरला स्थानिक दुकानदाराने गैरवर्तन केले आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेड्रो मोटा असे या डच Youtuber चे नाव असून तो बेंगळुरूमधील चोरबाजारला (Chor Bazaar) भेट देण्यासाठी आणि आपल्या यूट्यूब चॅनलसाठी ब्लॉग बनवण्यासाठी गेला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ त्याने त्याच्या Madly Rover चॅनलवर शेअर केला आहे. (Attacked At The Thieves Market In India)
या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यूट्यूबर रविवारी बेंगळुरूमधील चोर बाजारात फिरायला आणि खरेदीसाठी गेला होता. जिथे तो दुकानात उभा राहून सौदेबाजी करताना दिसत आहे. (Latest Marathi News)
यानंतर तो बाजारातील रस्त्यांवर फिरताना चोर बाजारातील दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे. त्यानंतर अचानक युट्युबरची एका व्यक्तीशी टक्कर होते. Youtuber त्या व्यक्तीला हॅलो सर म्हणतो, पण हा व्यक्ती रागाने त्याचा हात धरून "ये क्या है, ये क्या है" म्हणू लागतो. हा व्यक्ती युट्युबरला हातवारे करत विचारतो, तू दारूच्या नशेत आहेस का? आणि त्याशी गैरवर्तन करतो. त्यानंतर युट्युबर कसाबसा आपला हात सोडवून तिथून पळून जातो.
गुन्हा दाखल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यानंतर लोक युट्युबरसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. नवाब हयात शरीफ, असे या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्याविरुद्ध परदेशी पेड्रो मोटा यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी कलम ९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.