Ban on wearing hijab in schools of Madhya Pradesh... Saam TV
देश विदेश

Hijab Politics: मध्य प्रदेशातील शाळांमध्ये हिजाब परिधान करण्यास बंदी...

Hijab Politics In MadhyaPradesh: हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता शाळेत विद्यार्थिनींंनी हिजाब परिधान न करता शालेय गणवेशातच यावं असा आदेश देण्यात आला आहे.

साम टिव्ही

भोपाळ: देशात हिजाबच्या (Hijab) मुद्द्यावरुन राजकारण (Politics) तापत असताना आणखी एक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील सर्व शाळांमध्ये आता मुलींच्या हिजाब परिधान करण्यावर बंदी आणली आहे. मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार (Inder Singh Parmar) यांनी हा निर्णय जाहिर केला आहे. परमार म्हणाले की, हिजाब हा शालेय गणवेशाचा (School Uniform) भाग नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता शाळेत विद्यार्थिनींंनी हिजाब परिधान न करता शालेय गणवेशातच यावं असा आदेश देण्यात आला आहे. (Ban on wearing hijab in schools of Madhya Pradesh)

हे देखील पहा -

माध्यमांशी बोलताना परमार यांनी सांगितले की, शालेय शिक्षण विभाग शालेय गणवेशाशी संबंधित समस्यांची तपासणी करेल. हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग नाही. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात यावी. नियोजनबद्ध पद्धतीने शालेय शिक्षण चुकीच्या पद्धतीने मांडले जात (Politics) असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. “अशा परंपरांचे पालन घरातच केले पाहिजे. शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणाची चौकशी करू,' असेही शिक्षणमंत्री परमार म्हणाले. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून शाळांमध्ये ड्रेस कोड कार्यरत आहे. पुढील शैक्षणिक सत्रासाठी शालेय गणवेशाशी संबंधित महत्त्वाच्या सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, असे शालेय शिक्षणमंत्री परमार यांनी सांगितले.

हिजाबचा वाद कसा सुरू झाला?

हा सर्व वाद गेल्या महिन्यात जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केल्याने सुरू झाला होता. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती, परंतु तरीही त्यांनी तो परिधान केला होता, यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर इतर महाविद्यालयांमध्येही गदारोळ झाला.

अलीकडेच शिमोगामध्येही हिजाबच्या वादावरून कॉलेजमध्ये मोठा गदारोळ झाला होता. पोलिसांना येऊन प्रकरण शांत करावे लागले. या सर्व परिस्थितीत कर्नाटक सरकारने काही दिवसांपूर्वी कर्नाटक शिक्षण कायदा-1983 चे कलम 133 लागू केले आहे. त्यामुळे आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे.

हिजाब हा शाळेच्या गणवेशाचा भाग नाही. यावर मुस्लीम मुलींचे म्हणणे आहे की, त्या आधी हिजाब परिधान करून शिकत आहेत, याआधी कधीही यावरून वाद झाला नाही. हिजाबचे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातही पोहोचले. त्यावर आज सुनावणी होणार आहे. याबाबत कोर्टानं म्हटलं की हा निर्णय ते फक्त कायद्यानेच घेणार आहेत, भावनेने नाही. यासाठी न्यायालयाने कुराणाची प्रत मागवली असून त्या आधारे पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले. सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाबबाबत बाजू आणि विरोधकांच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT