Baloch Army attack Pakistan update : Saam tv
देश विदेश

Baloch Army attack Pakistan: पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 50 जवानांचा मृत्यू

Baloch Army attack Pakistan update : पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झालाय. या हल्ल्यात 50 जवानांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

बलुचिस्तानात गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानी सैन्यांकडून हल्ले सुरु आहेत. पाकिस्तानी सैन्यांच्या हल्यानंतर आता बलुचिस्तानच्या बलोच आर्मीने प्रतिहल्ला केला आहे. बलोच आर्मीने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ५० जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच आयएसआयचे ९ एजेंट देखील मारले गेले आहेत. बलोच आर्मीच्या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बलोच आर्मीने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी मिलिट्री इंटेलीजन्स आणि आयएसआयच्या ९ एजंट मारले गेले आहेत. बलोच आर्मीचं ७२ तास सुरु असलेल्या अनेक खनिज आणि गॅस टँकरला लक्ष्य केलं. या व्यतिरिक्त पाकिस्तानी सैन्याच्या ५ ड्रोनही नष्ट केले.

बलोच आर्मीच्या दाव्यानुसार, त्यांनी पाकिस्तानी सैन्यांवर ३० हल्ले केले. त्यातील २ हल्ले पाकिस्तानी गुप्तचर संस्थेवर करण्यात आले आहेत. तर ४ हल्ले पोलिसांच्या चेक नाके आणि ४ हल्ले सैन्याच्या चेक नाक्यावर करण्यात आले.

बलोच आर्मीने हल्ला करताना पाकिस्तानी सैन्याचं शस्त्रांची लूट केली. यात ऑटोमॅटिक मशीन गनचा समावेश आहे. बलोच आर्मीने संपूर्ण ऑपरेशन कोलवा, बेला, कच्छी आणि झालावान भागात चालवलं. पाकिस्तानी सरकार आणि सैन्य हे बलूचिस्तानची संपत्ती लुटत असल्याचा दावा बलोच आर्मीने केला आहे. याआधी सुहराब जिल्ह्यातील गिदरमध्ये सैन्याच्या तळावर केलेल्या हल्ल्यात १८ पाकिस्तानी सैन्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, एक दिवस आधी बलुचिस्तानच्या झोब क्षेत्रातून परतताना ९ मजुरांचं अपहरण करून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात या ९ मजुरांचा मृत्यू झाला होता. तर यादरम्यान बलुचिस्तानचे २० जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT