Bajrang Singh NSG Commando Arrest  x
देश विदेश

26/11 मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला अटक, २०० किलो गांजासह ATS ने रंगेहाथ पकडले

NSG Commando Arrest : एनएसजीचा माजी कमांडो बजरंग सिंगला अटक झाली आहे. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात तो सहभागी झाला होता. निवृत्तीनंतर त्याने अंमली पदार्थांची तस्करी सुरु केली.

Yash Shirke

  • माजी एनएसजी कमांडोला अटक

  • गांजा तस्करी प्रकरणात कारवाई

  • २०० किलो गांजा कमांडोकडून जप्त

Bajrang Singh NSG Commando Arrest : अंमली पदार्थ विरोध पथक (एएनटीएफ) आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या दोन संस्थांनी संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी बजरंग सिंगला अटक केली. बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी कमांडो होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान तो मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या एनएसजीच्या कारवाईत तो सहभागी झाला होता. बजरंग हा ओडिशा आणि तेलंगणा येथून गांजा आणून राजस्थानमध्ये त्याचे नेटवर्क चालवत होता. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

पोलीस पकडू नये यासाठी बजरंग मोबाईल फोन फार कमी प्रमाणात वापरत असे. तो एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नसे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर राजस्थानच्या एटीएसने त्याला अटक केली. कारवाईदरम्यान त्याच्याकडून २०० किलो गांजा जप्त करण्यात आला. बजरंगचा निर्भड स्वभाव आणि ओडिशा-तेलंगणा राज्यातील संपर्कांमुळे त्याने राजस्थानमध्ये नेटवर्क तयार केले होते, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली.

विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगने छोट्या व्यवहारांपासून ते क्विंटल आकाराच्या अंमली पदार्थाची तस्करी केली. त्याची अटक ही अंमली पदार्थांविरुद्ध सुरु असलेल्या मोहिमेसाठी महत्त्वाची घटना आङे. अटकेमुळे राजस्थानमधील गांजाच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त होण्यास मदत होईल. बजरंग सिंगची कहाणी धक्कादायक आहे. बीएसएफमध्ये सामील होण्यासाठी त्याने शिक्षण सोडले. कुस्तीगीरासारखी शरीरयष्टी आणि लढाऊ वृत्तीमुळे तो एनएसजी कमांडो बनला.

बजरंगने सात वर्षे दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये भाग घेतला होता. २००८ च्या २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान एनएसजीच्या ताज हॉटेल ऑपरेशनमध्ये तो सहभागी होता. २०२१ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. गावी परतल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर बजरंगने त्याच्या पत्नीला गावप्रमुख म्हणून उभे केले. यादरम्यान तो गुन्हेगारांशी जोडला गेला, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur Photos: अवनीत कौरच्या हॉट अदा, फोटोंवरून नजर हटणार नाही

Anardana Chutney: कंटाळवाणी हिरवी चटणी विसरा! करून बघा काश्मिरी अनारदाणाची चमचमीत चटणी

Buldhana Crime News: भरदिवसा युवकाची हत्या, संत नगरी शेगाव हादरलं

Maharashtra Live News Update : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात कारचा अपघात

Anushka Sen Photos: हॉट अन् बोल्ड दिसणारी ही अभिनेत्री कोण?

SCROLL FOR NEXT