Bajrang Punia News Saamtv
देश विदेश

Bajrang Punia: पंतप्रधान मोदींची भेट नाही, कुस्तीपटू बजरंग पुनियाने निवासस्थानाबाहेर ठेवला 'पद्मश्री'; VIDEO

Bajrang Punia: पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखले. पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचू न शकल्याने त्याने पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील फुटपाथवर आपला पुरस्कार ठेवला.

Gangappa Pujari

Bajrang Punia Return Padma Shri:

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निकटवर्तीयाची निवड झाल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारत सरकारने दिलेला पद्यश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहत आपली नाराजी व्यक्त केली. ज्यामध्ये त्याने पंतप्रधान मोदींना भेटून पुरस्कार परत करणार असल्याचे म्हणले होते. मात्र पंतप्रधानांची भेट न झाल्याने त्याने पंतप्रधानांच्या घराजवळ पदपथावर पुरस्कार ठेवला आणि निघून गेला.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचे सहकारी संजय सिंह यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूकीत विजय मिळवला. या निकालानंतर बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावलेल्या कुस्तीपटूंमध्ये नाराजी पसरली आहे. संजय सिंग यांच्या विजयानंतर साक्षी मलिकने (Sakshi Malik) कुस्तीला कायमचा रामराम ठोकला.

तसेच बजरंग पुनियानेही (Bajarang Punia) पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पद्यश्री पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले होते. घोषणा केल्यानंतर तो पुरस्कार परत करण्यासाठी निघाला. मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखले. पंतप्रधान मोदींपर्यंत (PM Narendra Modi) पोहोचू न शकल्याने त्याने पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील फुटपाथवर आपला पुरस्कार ठेवला.

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण ४७ जणांनी या निवडणुकीत मतदान केलं. यापैकी ४० मतं संजय सिंह यांच्या पारड्यात पडली तर अनिता यांना केवळ सात मते मिळाली. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT