Bageshwar Baba  x
देश विदेश

Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात घडला अनर्थ; चेंगराचेंगरीत महिला-लहान मुलं जखमी

Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात व्हिआयपी पासच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीय. या घटनेत ६ जण जखमी झालेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

बागेश्वर धामचे पीठासीन पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राजस्थानच्या भीलवाडा येथे प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. कार्यक्रमासाठी VIP पास घेऊन जाणाऱ्या भाविकांना अडवण्यात आलं. भाविकांकडे व्हीआयपी पास असल्यानंतरही त्यांना आत जाऊ दिलं जात नव्हतं. त्यामुळे गेटवर गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली.

या प्रकरणी बनवारी शरण महाराजांनी आयोजकांवर मनमानीचा गंभीर आरोप केलाय. व्हीआयपी पासच्या नावाने कमिटीने मनमानी केल्याचा आरोप त्यांनी केला. काठिया बाबा आश्रम परिसरात बागेश्वर बाबांच्या कथेचा कार्यक्रम होत होता. कमिटीने आश्रमच्या बाबांचं ऐकलंच नाही, असा आरोप आता केला जातोय. काठिया बाबा महंत बनवारीशरण महाराजांनी कमिटी आणि पोलिसांवरही या प्रकरणी आरोप केलेत.

या घटनेत जखमी झालेल्या महिला चंद्रकला सोमानी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “माझ्याकडे व्हीआयपी पास होता. मी बागेश्वर बाबांच्या कथा ऐकण्यासाठी व्हीआयपी गेटवर पोहोचले. पण मला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्याचवेळी अनेकजण व्हीआयपी गेटवर जमले होते. त्यांनाही आतमध्ये प्रवेश दिला नाही. त्यामुळेच तिथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: अमिर खानसोबत नेमकं काय घडलं? हमसून रडला, शर्टाने पुसले डोळे, VIDEO व्हायरल

Why do we get nightmares: रात्री अचानक घाबरवणारी स्वप्नं का पडतात? वाचा त्यावेळी मेंदूत नेमकं काय घडतं?

High Blood Pressure : हाय BP च्या औषधांना कंटाळलात? 'या' ५ आयुर्वेदिक उपायांनी रक्तदाब राहील नियंत्रणात

Blouse Back Neck Designs: सिंपल टू मॉडर्न, स्लिव्हलेस ब्लाऊजचे ट्रेडिंग 5 पॅटर्न

Maharashtra News Live Update: ठाण्यातील कासारवडवलीच्या निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात हाणामारी

SCROLL FOR NEXT