Baba Bageshwar statement on meat and fish during Durga Puja saam tv
देश विदेश

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Baba Bageshwar Dham : पश्चिम बंगालमध्ये मांस आणि माशांच्या विक्रीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. बाबा बागेश्वर यांनी केलेल्या विधानानंतर मांसाहारावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.

Bharat Jadhav

  • दुर्गापूजा मंडपाजवळ मांसाहारी पदार्थांची विक्री किंवा सेवन न करण्याचं आवाहन

  • पश्चिम बंगालमध्ये मटण-माशांवर राज्यव्यापी बंदी लागू झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही

  • धार्मिक आवाहनाला राजकीय प्रतिक्रिया मिळाल्याने हा मुद्दा आता बंगालच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये मटण-मासे खाण्यावरून वाद पेटलाय. जन्माष्टमीनिमित्त 'बाबा बागेश्वर' धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 'हनुमान कथा' सांगताना एक वादग्रस्त विधान केलंय. दुर्गापूजेदरम्यान देवी दुर्गाच्या मूर्तीजवळ मांस आणि माशांची विक्री करणारे स्टॉल्स लावू नयेत, अशी विनंती करताना त्यांनी मटण-मासे खाणाऱ्यांना पाखंडी म्हटलंय.

दुर्गापूजेदरम्यान मांस खाणारे हिंदू धर्माचा अनादर करत आहेत, असं विधान धीरेंद्र शास्त्रींनी केलंय. त्यांच्या विधानाने पश्चिम बंगालमध्ये वाद वाढलाय. त्यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी दुर्गापूजेदरम्यान मांस आणि माशांवर बंदी घालण्याच्या विचारात आहेत का, अशा चर्चांना उधाण आलंय.

धीरेन्द्र शास्त्रींनी आणखी काय सांगितले?

बाबा बागेश्वर आपल्या कथा वाचनात म्हणाले की, दुर्गा पूजेदरम्यान मांडवांच्या (पंडालच्या) आसपास मांसाहारी अन्न शिजवणे, त्याचे सेवन करणे किंवा त्याची विक्री करणे या गोष्टींना त्यांचा तीव्र विरोध आहे. 'हनुमंत कथा' सांगताना त्यांनी बंगालमधील हिंदूंना नवरात्री साजरी करण्याचे आवाहन केलं.

धीरेन्द्र शास्त्रींनी हिंदूंना नवरात्रीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि माता दुर्गेचे मांडव व मूर्तींच्या परिसरात मांसाहारी अन्न शिजवू नये, त्याचे सेवन करू नये किंवा विक्री करू नये, असे आवाहन त्यांनी केलंय. अनेक अहवालांनुसार, त्यांनी दुर्गापूजेदरम्यान मांस आणि मासे खाणाऱ्यांना ' पाखंडी म्हणजेच ढोंगी ' असेही संबोधले, ज्यामुळे या वादाची धग आणखी वाढलीय.

मांस आणि मासे खाण्यावरून वाद का निर्माण झाला आहे?

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिथल्या लोकांसाठी हा केवळ एक धार्मिक विधी नसून त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या उत्सवाच्या काळात पंडालमध्ये म्हणजेच मंडळात मटण, चिकन, मासे आणि सी-फूड (समुद्री खाद्यपदार्थ) यांची विक्री केली जाते. विशेष म्हणजे लोक या पदार्थांचा आस्वाद घेतात. ही तिथली एक सामान्य प्रथा आहे. अशा पार्श्वभूमीवर, दुर्गा पूजेदरम्यान मांसाहार न करण्याचा सल्ला देणाऱ्या बाबा बागेश्वर यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झालाय.

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिलीय. दुर्गापूजेदरम्यान बंगाली लोकांनी काय खावे, हे कोणताही साधू किंवा संत ठरवणार नाही. वास्तविक, मांस आणि मासे खाण्याचा हा मुद्दा यापूर्वी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यानही उपस्थित झाला होता. टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अनेक सभांमध्ये असा दावा केला होता की, जर भाजप सत्तेवर आला, तर तो बंगालमधील लोकांना मांसाहार करू देणार नाही. दरम्यान भाजपने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. पक्षाने म्हटले की, त्यांना केवळ गोमांस विक्रीलाच आक्षेप घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chunyache Pani: १५ दिवस चुन्याचे पाणी प्यायल्याने काय होते?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Transgender Fight: बस्ती मागण्यावरून वाद विकोपाला; आळंदीच्या इंद्रायणी घाटावर तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT