Special Agarbatti For Ram Mandir Special Agarbatti For Ram Mandir
देश विदेश

Ayodhya Ram Mandir : वजन ३५०० किलो, लांबी १०८ फूट... भव्य अगरबत्ती ट्रकमधून अयोध्येला रवाना, पाहा VIDEO

प्रविण वाकचौरे

Ram Madir News :

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. येत्या २२ जानेवारी रोजी देशभर दिवाळीचा माहौल असणार आहे. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याची आणि राम मंदिरासाठी काहीतरी अर्पण करण्यासाठी अनेकांचा इच्छा आहे. गुजरातमधील राम भक्तांनीही प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त १०८ फुटांची अगरबत्ती तयार केली आहे.

राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ही १०८ फूट लांब अगरबत्ती प्रज्वलित करण्यात येणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथे ही अगरबत्ती बनवण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्येला या अरबत्तीचा सुगंध जाईल, असा दावा देखील ती बनवणाऱ्यांनी केला आहे. ३१ डिसेंबरला ही अगरबत्ती एका मोठ्या ट्रकवर ठेवून अयोध्येला रवाना करण्यात आली आहे. या भव्य अगरबत्तीला पाहण्यासाठी लोकांची रस्त्यावर मोठा गर्दी होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामललाच्या भव्य मंदिरासाठी प्रत्येक रामभक्ताच्या मनात काहीतरी अर्पण करण्याची इच्छा असते. जोधपूरचे देशी तूप, कंबोडियाचे राज आणि थायलंडच्या हळदीनंतर आता गुजरातच्या रामभक्तांनी रामललासाठी १०८ फूट लांब अगरबत्ती अर्पण केली आहे.

अगरबत्तीचा आकार

अगरबत्ती १०८ फूट लांब, साडेतीन फूट जाड आहे. त्यात अनेक सुगंधी घटक मिसळण्यात आले आहेत. सुमारे तीन ते चार महिने ही अगरबत्ती तयार करण्यासाठी लागले. अगरबत्ती तयार करण्यासाठी गायीच्या तुपाचाही वापर करण्यात आला आहे. याशिवाय हवन साहित्याचाही वापर करण्यात आला आहे. या अगरबत्तीचे वजन ३५०० किलो आहे. अगरबत्ती ४५ दिवस जळत राहिल, असा दावाही ती बनवणाऱ्यांनी केला आहे. अगरबत्तीचा सुगंध १५ ते २० किमी परिसरात पसरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT