Ram Mandir News : राम, लक्ष्मण, सीता, हनुमान... मंदिरात प्रतिष्ठापणा होणाऱ्या मूर्तीवर शिक्कामोर्तब; केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला फोटो

Ayodhya Ram Mandir Latest News : प्रभू श्रीराम यांच्या ३ मूर्ती बनवल्या होत्या. २ दिवसांपूर्वीच राम जन्मभूमी न्यासाने या सर्व मूर्तींची पाहणी करत एका मूर्तीवर शिक्कामोर्तब केलं होतं.
Ram Mandir Date 2024
Ram Mandir Date 2024Saam tv
Published On

Ram Mandir News :

अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी रात्रंदिवस प्रशासन काम करत आहे. दुसरीकडे राम मंदिरात प्रतिष्ठापणेसाठी तीन मूर्तींपैकी एकाची निवड केली जाणार होती, आता त्याची निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रभू श्रीराम यांच्या ३ मूर्ती बनवल्या होत्या. २ दिवसांपूर्वीच राम जन्मभूमी न्यासाने या सर्व मूर्तींची पाहणी करत एका मूर्तीवर शिक्कामोर्तब केलं होतं. मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणारी मूर्ती कर्नाटकचे मूर्तिकार योगीराज अरुण यांनी तयार केली असल्याचं मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.

राम हनुमानाच्या अतूट नात्याचे हे आणखी एक उदाहरण. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातील मूर्तीकाराने रामलल्लाची ही महत्त्वाची सेवा केली, असं ट्वीट मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे.

मूर्तीसाठी खास दगडांची निवड

प्रभू श्रीरामाची मूर्ती बनवण्यासाठी ट्रस्टने नेपाळच्या गंडकी नदीसह कर्नाटक, राजस्थान आणि ओरिसा येथून 12 उच्च दर्जाचे दगड मागवले होते. या सर्व दगडांची चाचणी केली असता केवळ राजस्थान आणि कर्नाटकातील खडकच मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचे आढळले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com