Shubhanshu Shukla Saam Tv News
देश विदेश

Shubhanshu Shukla : अभिमानास्पद! What a ride...शुभांशू शुक्ला यांचा अंतराळातून पहिला मेसेज, भारतीयांची मान उंचावली

Shubhanshu Shukla : "नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो, What a ride... 41 वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत आणि ही एक अद्भुत राइड होती. सध्या आम्ही पृथ्वीभोवती 7.5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत."

Prashant Patil

नवी दिल्ली : भारताचे शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अ‍ॅक्सिओम-4 मिशनने कैनेडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स 39ए वरून उड्डाण केले आहे. या यानाने भारतीय वेळेनुसार दुपारी १२.०१ वाजता उड्डाण केलं. अंतराळात रवाना झाल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळ प्रवासाबद्दल आपला संदेश दिला.

माझ्या प्रिय देशवासियांनो... नमस्कार

'नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो, What a ride... 41 वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत आणि ही एक अद्भुत राइड होती. सध्या आम्ही पृथ्वीभोवती 7.5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे, जो मला सांगत आहे की मी एकटा नाही, मी तुमच्या सर्वांसोबत आहे', असा संदेश त्यांनी पाठवला.

अंतराळयानातून शुभांशू शुक्ला म्हणाले की ही माझ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासाची सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. मला असं वाटतं की, सर्व देशवासीयांनी या प्रवासाचा भाग व्हावं. तुमची छाती अभिमानाने आणखी फुगली पहिजे. तुम्हीही असाच उत्साह दाखवला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून भारताचा हा मानवी अंतराळ प्रवास सुरू करूया. धन्यवाद, जय हिंद, जय भारत.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला हे १९८४च्या राकेश शर्मा यांच्या मोहिमेनंतर या स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरतील. २८ तासांच्या प्रवासानंतर, अंतराळयान उद्या गुरुवारी दुपारी ४:३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT