लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीसाठी जबाबदार कोण यावरून उत्तर प्रदेशमध्ये पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असतानाच लेखक चेतन भगत यांनी देखील पराभवाचं विश्लेषण करताना पक्षाला मतदारांची आठवण करून दिली आहे. भाजपच्या मतदारांचे A, B, C असे वर्गीकरण करता येईल, A म्हणजे Aggressive (आक्रमक), B म्हणजे Business (व्यापारी) आणि C म्हणजे Charishma (करिष्मा).
मात्र, यातील व्यापारी आणि मोदी करिष्मा यामुळे भाजपला साथ देणारा वर्ग पक्षापासून दुरावल्याने पक्षाची डोकेदुखी वाढल्याचा दावा चेतन भगत यांनी केला आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात चेतन भगत यांनी मंगळवारी लेख लिहिला आहे. यात चेतन भगत यांनी उत्तर प्रदेशमधील योगी विरुद्ध पक्ष या वादाचा दाखला देतानाच भाजपच्या पराभवाचे विश्लेषण केले आहे.
A - Aggressive
आक्रमक मतदार हा भाजपचा कोअर बेस आहे. या मतदारांचे प्रमाण २० ते २५ टक्के असून अडवाणींच्या काळापासून हा मतदार पक्षासोबत आहे. २०२४ मध्ये हा मतदार भाजपसोबतच उभा राहिला.
B - Business
यात व्यापारी, उद्योजक यांचा समावेश आहे. या मतदारांना असे वाटते की राष्ट्र आणि उद्योग निर्मितीसाठी भाजप हा योग्य पक्ष आहे. या वर्गात उच्चशिक्षित मतदारही आहेत. यूपीए- २ च्या काळात भ्रष्टाचाराची प्रकरणं चव्हाट्यावर येत असताना भाजपला संधी द्यावी असे या वर्गाला वाटत होते. यात गरीब, कष्टकरीही येतात. कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत या वर्गाला काँग्रेसपेक्षा भाजपवर विश्वास जास्त आहे. असे सुमारे १० टक्के मतदार आहेत.
C- Charishma or Charm
मोदींच्या Larger Than Life या प्रतिमेमुळे प्रभावित झालेला हा वर्ग आहे. यात सुमार ५ ते १० टक्के मतदार आहेत. याच वर्गाने २०२४ मध्येही भाजपला पाठिंबा दर्शवल्याने पक्षाला सत्ता स्थापन करता आली.
चेतन भगत यांच्या मते व्यापारी, उद्योजक आणि मोदींमुळे प्रभावित झालेले मतदार आता भाजपासून दुरावले आहेत. आत्ताच मतदार काँग्रेसचं का ऐकत असावेत, राहुल गांधी नेहमीचं भाषणं करतात, मग यंदाच त्यांच्या भाषणांचा प्रभाव का पडला, या प्रश्नांकडे भाजपने गांभीर्याने बघितलं पाहिजे. सारं काही आलबेल आहे अशा समजूतीत भाजपने राहण्यापेक्षा नेमकं काय चुकले यावर काम करावं आणि त्यानुसार बदल करावेत, असा सल्लाही चेतन भगत यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.