जेव्हा विदेशी अधिकारी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देतो Saam Tv News
देश विदेश

जेव्हा विदेशी अधिकारी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देतो

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एका विदेशी अधिकाऱ्याच्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एका विदेशी अधिकाऱ्याच्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहे. त्याचं कारण म्हणजे हे अधिकारी (Barry O’Farrell AO) ऑस्ट्रेलियन असून ते ऑस्ट्रेलियाचे भारतीय उच्चायुक्त (AusHCIndia) आहेत. त्यांनी ट्विट करत चक्क मराठी भाषेत 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' असं लिहीत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सध्या हे ट्विट व्हायरल होत आहे. (australian officer give birthday wishes to CM in marathi language)

एकीकडे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे राष्ट्राच नेतृत्व करायला सक्षम आहेत, असं आजचं म्हंटलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं होतं. त्यानंतर आता थेट परदेशी अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना मराठीतून शुभेच्छा दिल्यामुळे उद्धव ठाकरे हे आंतराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवत आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

Buttermilk Vs Curd: ताक की दही, उपवासाला कोणता पर्याय फायदेशीर?

Accident: धावत्या कारने डिव्हायडरला धडक देत घेतला पेट, ४ जण जिवंत जळाले

Kidney Stones : किडनी स्टोनचा धोका टाळायचाय? रोज प्या 'इतके' ग्लास पाणी

SCROLL FOR NEXT