Vande Bharat Express Saam TV
देश विदेश

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर हल्ला; प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनवर अज्ञातांकडून दगडफेक

हावडा-न्यू जलपाईगुडीला वंदे भारत एक्स्प्रेसवर सोमवारी अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. हावडा-न्यू जलपाईगुडीला वंदे भारत एक्स्प्रेसवर सोमवारी अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे. यात रेल्वेच्या दरवाजाची काच फुटून नुकसाना झाले आहे. मालदा कुमरगंज येथे ही घटना घडली आहे. चार दिवसांआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. (Latest Vande Bharat Express News)

सदर घटनेविषयी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस मालदा कुमरगंज येथून निघाली होती. एक्सप्रेस काही अंतरावर पोहचताच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. दगडफेक केल्याने बोगी क्रमांक सी -१३ चा दरवाजा आणि खिडकीची काच फुटली गेली. यावेळी ट्रेनमध्ये प्रवासी बसलेले होते. मात्र सुदैवाने काणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

ट्रेनवर अचानक दखडफेक झाल्याने प्रवाशांना नेमके काय सुरू आहे हे समजत नव्हते. या घटनेने सर्वच प्रवाशी भयभीत झाले होते. ३० डिसेंबर रोजी या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन देखील याच दिवशी झाले होते. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Fridge Cleaning : तुमच्या फ्रिजमधून दुर्गंध येतोय? तर वाचा हे सोपो घरगुती उपाय

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT