देश विदेश

Indian Consulate Set Fire In San Francisco: सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला; खलिस्तान समर्थकांनी केली जाळपोळ

Priya More

America News: अमेरिकेमध्ये (America) भारतीय दुतावासावर हल्ला (Attack On Indian Embassy) झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हा हल्ला करण्यात आला आहे. खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला करत घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अमेरिकेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. गेल्या 5 महिन्यांतील भारतीय दुतावासावरील हा दुसरा हल्ला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला. खलिस्तानींनी भारतीय दूतावासाला टार्गेट करत जाळपोळ केली. या आगीमध्ये भारतीय दुतावासाचे मोठे नुकसान झाले नाही. पण एक कर्मचारी जखमी झाला आहे. सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन दलाने आग तातडीने विझवली त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही.

गेल्या पाच महिन्यात खलिस्तान समर्थकांकडून भारताच्या वाणिज्य दूतावासावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. पहिला हल्ला मार्चमध्ये झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. खलिस्तानी समर्थकांनी या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे. अमेरिकेने या घटनेचा निषेध केला आहे. मात्र भारतीय दूतावासाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, 'सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात झालेल्या तोडफोडीचा आणि जाळपोळीचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा अमेरिका तीव्र निषेध करते. अमेरिकेमधील राजनैतिक सुविधा किंवा परदेशी मुत्सद्दी विरुद्ध तोडफोड किंवा हिंसाचार हा फौजदारी गुन्हा आहे. तोडफोड आणि हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.'

खलिस्तान समर्थकांकडून भारतीय दुतावासावर हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मार्चमध्ये खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता. यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी देखील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी निषेध केला आहे. तसंच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT