Operation Lotus in Bihar: महाराष्ट्रानंतर 'बिहार'मध्येही भाजपचं ऑपरेशन लोटस? लालू प्रसाद यादव यांनी केलं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रानंतर 'बिहार'मध्येही भाजपचं ऑपरेशन लोटस? लालू प्रसाद यादव यांनी केलं मोठं वक्तव्य
Lalu Prasad Yadav on Pm Modi
Lalu Prasad Yadav on Pm ModiSaam TV
Published On

Lalu Prasad Yadav on Pm Modi: महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. त्यानतंर आता भाजप बिहारमध्येही ऑपरेशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. या मागचं कारण म्हणजे आरजेडीचे अध्यक्ष लालूं प्रसाद यादव यांचं एक वक्तव्य. लालू म्हणाले आहेत की, पंतप्रधानांना विरोध करणाऱ्यांचे असेच हाल होतील.

लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी सगळीकडे लूट करत असल्याचा आरोप लालूंनी केला. महाराष्ट्रानंतर नरेंद्र मोदींचा डोळा आता बिहारवर आहे, मात्र नितीश कुमार आणि आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही, असे लालू म्हणाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर लिहिलेल्या 'अंतरंग दोस्तों की नजर में नितीश कुमार' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी लालू यादव असं म्हणाले आहेत.

Lalu Prasad Yadav on Pm Modi
Maharashtra Politics Sacred Games: कुछ बड़ा होने वाला है! शरद पवारांसह दोन-तीन नेत्यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात 'सेक्रेड गेम्स'चा थ्रील

लालू यादव यांनी शरद पवार यांचे समर्थन करत ते एक कणखर नेते असून त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे म्हणाले.  शरद पवार यांच्याबाबत जे काही झाले आहे, त्याचा बदला आम्ही घेऊ, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी आरक्षणावर संकट निर्माण करत आहेत. पंतप्रधान भ्रष्टाचारावर बोलतात, त्यांच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार कोण करतोय का? लालूंनी पंतप्रधानांवर अदानींची बाजू घेत असल्याचा आरोपही केला. लालू म्हणाले की, नरेंद्र मोदी द्वेष पसरवत आहेत. देशभरात बांधवांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. आम्ही लढू, एकत्र भारताचे रक्षण करू. (Latest Marathi News)

Lalu Prasad Yadav on Pm Modi
National Political News: महाराष्ट्रात भूकंप, दिल्लीत हादरे; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजधानीतही पडले दोन गट

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंगेरचे खासदार ललन सिंह यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या फुटीवरून भाजपवर निशाणा साधला. ही भाजपची खेळी असल्याचे ते म्हणाले. त्यांचा लोकांवर विश्वास नसून ते फुटाफुटीचे राजकारण करतात, असंही ते म्हणाले आहेत. बिहारमध्येही भाजप असे प्रयत्न करत आहे का, या प्रश्नावर ललन सिंह म्हणाले की, बरेच प्रयत्न झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com