4 States Assembly Election Result: Congress Out Of Power In Rajasthan 4 States Vidhan Sabha Election Result BRS -Saam TV
देश विदेश

4 States Election Result Updates: मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी; छत्तीसगडमध्ये अटीतटीची लढत, तेलंगणात BRSच्या सत्तेला सुरुंग

4 States (Madhya Pradesh, Rajasthan, chhattisgarh, Telangana) Assembly Election Result 2023: देशातील चार राज्यांच्या निवडणूकांचे निकाल समोर येत आहेत. तेलंगणामध्ये कॉंग्रेसने विजयी घौडदौड सुरू केली असून बीआरएस सत्तेतून पायउतार व्हावे लागण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

Gangappa Pujari

4 States Vidhan Sabha Election Result 2023:

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीगड विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती येत आहेत. चार राज्यांपैकी दोन राज्यात कॉंग्रेस तर दोन राज्यात भाजपमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळत आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून दोनही राज्यात भाजपने विजयी आघाडी घेतली आहे.

देशातील चार राज्यांच्या निवडणूकांचे निकाल समोर येत आहेत. तेलंगणामध्ये कॉंग्रेसने विजयी घौडदौड सुरू केली असून बीआरएस सत्तेतून पायउतार व्हावे लागण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. तर दुसरीकडे राजस्थान आणि मध्य प्रदेशात मात्र कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

राजस्थानमध्ये कॉंग्रेसला धक्का.. ( Rajasthan Election Results)

राजस्थानमध्ये एकूण २०० विधानसभा जागांसाठी मतदान झाले. सुरूवातीच्या कलामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या कलात भाजपने १२५ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे तर कॉंग्रेस ६२ जागांवर आहे. त्यामुळे यंदाही दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

मध्यप्रदेशात कमळ फुलणार... (Madhya Pradesh Election Results)

तसेच मध्यप्रदेशमध्येही भाजपने कॉंग्रेस जोरदार धक्का देत मोठी आघाडी घेतली आहे. मध्यप्रदेशात २३० विधानसभा जागांपैकी भाजप १३७ जागांवर आघाडीवर आहे, तर कॉंग्रेस ९२ जागांवर आघाडीवर आहे. प्राथमिक कलानुसार दोन मोठ्या राज्यांमध्ये भाजप बहुमताचे आकडे गाठताना दिसत आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्तीसगड, तेलंगणात कुणाचा गुलाल?

छत्तीसगडमध्ये भाजप आणि कॉंग्रेमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने ४५ जागांवर आघाडी घेतली असून भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. दोन ठिकाणी इतरांना यश मिळाले आहे. त्यामुळे छत्तीसडमध्ये कॉंग्रेस पुन्हा गड राखणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये मात्र कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून बीआरएसला धक्का बसताना दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT