Actor Vijay’s party TVK is reportedly in talks with BJP for a possible alliance ahead of the Tamil Nadu Assembly elections. Saam Tv
देश विदेश

Assembly Election: विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपनं पहिला मोठा डाव टाकला

Assembly Elections 2026: निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Bharat Jadhav

देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच भाजप कामाला लागली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं रविवारी पत्रकार परिषद घेत केरळसह इतर चार राज्यातील निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली. निवडणुकांचा बिगुल वाजल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपनं ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत सुरेंद्रन यांना मंजेश्वरमधून, व्ही. मुरलीधरन यांना कळाकूटममधून, नव्या हरिदास यांना कोझिकोड उत्तरमधून आणि प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांना नेमोममधून तिकीट देण्यात आले आहे.

आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. के. सुरेंद्रन मंजेश्वर मतदारसंघातून, नव्या हरिदास कोझिकोड उत्तरमधून, अ‍ॅडव्होकेट जॉर्ज कुरियन कांजीरापल्लीमधून, व्ही. मुरलीधरन कझाकूटममधून आणि प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर नेमोममधून निवडणूक लढवतील.

केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. निवडणुकीची अधिसूचना १६ मार्च रोजी जारी केली जाणार आहे. उमेदवार २३ मार्च २०२६ पर्यंत नामांकन दाखल करू शकतात. २४ मार्च रोजी नामांकनांची छाननी केली जाईल. उमेदवार २६ मार्चपर्यंत आपले नामांकन मागे घेऊ शकतात. केरळमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT