Assam road accident 
देश विदेश

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

Assam Accident News : आसामच्या कामरूप जिल्ह्यात NH-27 महामार्गावर प्रवासी वाहनाचे नियंत्रण सुटून ट्रकला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Assam road accident Death Toll : आसाममधील कामरूप (Kamrup) जिल्ह्यात एका भीषण रस्ते अपघातात ५ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. एका भरधाव प्रवासी मिनीबस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये मिनी बसचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ७ जणांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रवासी मिनीबस भरधाव वेगात जात असताना कामरूप जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धडक इतकी जोरदार होती की मिनीबसचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला आणि आत बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले.

स्थानिकांकडून तातडीने मदतकार्य

अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. स्थानिकांनी आणि पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर गाडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. दुर्दैवाने ५ प्रवाशांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

अपघातातील गंभीर जखमींना तात्काळ गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMCH) तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलीस तपास सुरू

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनांना रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते? चालक झोपलेला होता की वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता? याचा अधिक तपास कामरूप पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

Clove Water Benefits: सलग १० दिवस लवंगाचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Thane : भीषण दुर्घटना! ठाण्यात ५ जणांचा बुडून मृत्यू, पोहायला गेले ते परत आलेच नाहीत

SCROLL FOR NEXT