आसाम- मिझोरम सीमा संघर्षात पुण्याच्या IPS अधिकारी वैभव निंबाळकरांनी मृत्यूशीही दिली यशस्वी झुंज Saam Tv
देश विदेश

आसाम- मिझोरम सीमा संघर्षात पुण्याच्या IPS अधिकारी वैभव निंबाळकरांनी मृत्यूशीही दिली यशस्वी झुंज

आसाम केडरचे आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर मूळचे पुण्याचे....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : आसाम Assam- मिझोराम Mizoram सीमा संघर्षामध्ये border conflict गंभीर जखमी झालेले आसाम मधील कछर Kachhar जिल्ह्याचे पोलीस Police अधीक्षक वैभव निंबाळकर Vaibhav Nimbalkar यांच्या प्रकृती मध्ये चांगली सुधारणा झाली आहे. ते आता वॉकरच्या सहायाने पावले टाकू शकत आहेत. नुकतेच त्यांचा हॉस्पिटल Hospitalमध्ये वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असतानाचा एक फोटो त्यांची पत्नी अनुजा हिने सोशल मीडियावर social media शेअर केला आहे.

यामुळे पुण्यासह Pune महाराष्ट्रामधील जनतेने आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा हा निधड्या छातीचा वीर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. निंबाळकर यांचे कुटुंबीय, सुहृद, मित्र परिवार यांच्यासह आसामच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागालाही दिलासा दिला आहे. सेंटीनेल ई-पेपरने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हे देखील पहा-

पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे सध्या मुंबई Mumbai मधील कोकिलाबेन Kokilaben अंबानी Ambani रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनीही निंबाळकर यांच्या प्रकृतीत या सुधारणेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या प्रकृती मध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे नमूद केले आहे. मूळचे ते पुण्याचे असलेले वैभव निंबाळकर २००९ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत निवड झालेले ते सर्वांत तरुण अधिकारी आहेत.

आसाम केडर प्राप्त झाल्यापासून ते आसाममध्ये कार्यरत आहे. २६ जुलै दिवशी आसाम- मिझोराम यांच्यात सीमावादावरून वादग्रस्त लैलापूर या भागात हिंसक चकमक उडालेली होती. त्यात गोळीबार मध्ये आसामच्या पोलिस दलामधील ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. वैभव निंबाळकर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह अन्य ६० पोलिस देखील जखमी झाले आहेत.

या गोळीबारात वैभव निंबाळकर यांच्या ओटीपोटात आणि मांडीच्या हाडाला गोळी लागल्यामुळे अनेक ठिकाणी ते फ्रॅक्चर झाले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधी सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर इतर तिघांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना, वैभव निंबाळकर यांची प्रकृती मध्ये बिघडल्यामुळे त्यांना तातडीने हेलिकॉप्टर आणि अम्ब्युलन्सच्या साहयाने मुंबई मधील कोकिलाबेन रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता १७- १८ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या जखमा भरून बऱ्या होत आहेत, ते हळूहळू हिंडू आणि फिरू लागले आहेत.

डॉक्टरांनी देखील याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. एक धाडसी अधिकारी म्हणून वैभव निंबाळकर यांची ख्याती आहे, अशा अधिकाऱ्याला आणि अन्य पोलिसांना अशा राज्यांमधील सीमावादातून झालेल्या संघर्षात गोळ्या झेलाव्या लागाव्यात यावरून देशभरात सर्वत्र टीकेची चर्चा रंगत आहे. 2 राज्यांच्या सीमावादावरून पोलीस दलांमध्ये झालेला हिंसाचाराचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT