Sakshi Sunil Jadhav
ठाण्यातील जांभळी नाका हे नवरात्राच्या दिवसात गरब्यासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
नवरात्रात इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते.
जांभळी नाका परिसरात भव्य पंडाल, मांडव व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात. स्थानिक तरुण मंडळे गरब्याचे नियोजन करतात.
नवरात्राच्या काळात जांभळी नाका येथे छोटेखानी जत्रेचे स्वरूप दिसते. आकाशपाळणा, खाद्यपदार्थ, खेळणी व स्थानिक हस्तकला वस्तूंची दुकाने लावली जातात.
फक्त गरबा नव्हे तर भक्तिगीते, देवीची आरती आणि नृत्यस्पर्धा याही कार्यक्रमांमुळे गर्दी जमते.
जांभळी नाक्याचा गरबा हा कुटुंबांसाठी सुरक्षित आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा उपक्रम मानला जातो.
ठाणे शहरासोबत मुंबईच्या विविध भागातून लोक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
ठाण्यातील जांभळी नाका व्यतिरिक्त कोपरी, वागळे इस्टेट, लुईसवाडी व पाचपाखडी परिसरातही मोठे गरबा आयोजन केले जाते.