crime Saam Digital
देश विदेश

Assam Case : अत्याचारातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला, तलावात उडी मारल्याने जीव गमावून बसला

Assam minor girl Case : आसामध्ये सामूहिक महिला अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. अत्याचारातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतर तलावात उडी मारल्यानंतर जीव गमावून बसला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : आसाम सामूहिक प्रकरणातील मुख्य आरोपी तफजुल इस्लाम याचा मुत्यू झाला आहे. पोलीस आज सकाळी ४ वाजता आरोपीला क्राइम सीन रिक्रएट करण्यासाठी घटनास्थळी घेऊन जाताना ही घटना घडली आहे. आरोपीने तलावात उडी मारून पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तलावात २ तास शोधल्यानंतर आरोपीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, तफजुलने आज सकाळी ४ वाजता प्रकरणाच्या तपासासाठी घटनास्थळी नेताना तलावात उडी मारून पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तलावात उडी मारल्याने पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. दोन तासांच्या शोधानंतर तफजुलचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी शुक्रवारी तफजुलला अटक केली होती. त्याची ओळख सामूहिक अत्याचारातील तिसऱ्या आरोपीच्या रुपात झाली. दुसरीकडे या प्रकरणातील दोन अन्य आरोपींचा तपास सुरु आहे.

सामूहिक अत्याचाराचा आरोपीच्या मृतावर पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, 'आरोपीला चौकशीसाठी घटनास्थळी नेण्यात आलं. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. पळण्याचा प्रयत्न करताना आरोपीने तलावात उडी मारली. आरोपी पळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी नाकाबंदी केली. त्यानंतर तातडीने एसडीआरएफला बोलावलं. तपासानंतर आरोपीचा मृतदेह तलावातून बाहेर काढून ताब्यात घेतला. आरोपी पळताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. आसाम सामूहिक अत्याचार प्रकरणातील एका आरोपीचा तपास सुरु आहे. त्यांनाही लवकरच अटक करणार आहे'.

काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'आसामच्या धींग भागाताली ही घटना आहे. अल्पवयीन मुलगी गुरुवारी सांयकाळी शिकवणीतून घरी परतत होती. त्यावेळी रस्त्यात तीन लोकांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या नजीक सापडली. या मुलीला पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. शुक्रवारी लोक या घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. या घटनेवरून लोकांनी एकच संताप व्यक्त केला होता. यादिवशी घटनेच्या निषेधार्थ दुकानदारांनी दुकान बंद ठेवले होते. आंदोलनाच्या दिवशी नागरिकांनी महिलांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TDR File Approval : महापालिकेची मोठी घोषणा! टीडीआर प्रक्रिया आता फक्त ९० दिवसात, 'या' तारखेपासून नियम लागू होणार

Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

SCROLL FOR NEXT