Assam Accident News Saam TV
देश विदेश

Assam Accident News : पिकनिकला जाताना काळाने गाठलं; बस आणि ट्रकमधील भीषण अपघात १२ जणांचा मृत्यू, २५ जखमी

Assam Accident News : अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसाक गोलाघाट जिल्ह्यातील देरगाव परिसरात हा अपघात झाला आहे.

प्रविण वाकचौरे

Assam Accident News :

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकाची स्थिती नाजूक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचा धोका वर्तवला जात आहे. (Latest News)

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसाक गोलाघाट जिल्ह्यातील देरगाव परिसरात हा अपघात झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बसमध्ये ४५ जण प्रवास करत होते. सर्वजण पिकसाठी निघाले होते. मात्र पहाटे ५ वाजेच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती, बसचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व प्रवासी तिनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात पिकनिकसाठी जात होते. जखमींना सध्या जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात प्राण गमावलेल्या १२ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

SCROLL FOR NEXT