आसाममध्ये उग्रवाद्यांनी पाच ट्रक चालकांना जिवंत जाळले Saam Tv
देश विदेश

आसाममध्ये उग्रवाद्यांनी पाच ट्रक चालकांना जिवंत जाळले

आसाम मधील दिमा हसाओ या जिल्ह्यामध्ये उग्रवाद्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : आसाम Assam मधील दिमा हसाओ Dima Hasao या जिल्ह्यामध्ये उग्रवाद्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. उमरंगसो लंका Umarangso Lanka रोडवर १नाही तर थेट ७ ट्रकला आग Fire लावण्यात आली आहे. या आगीमध्ये ५ ट्रक चालकांचा जळून दुर्दैवी मृत्यू Death झाला आहे.

हे देखील पहा-

गुरुवारी रात्री दिमा हसाओ जिल्ह्यामधील उमरंगसो लंका रोडवर दिसमाओ Dismao गावाजवळून ७ ट्रक चालले होते. या दरम्यान उग्रवाद्यांनी ट्रकच्या दिशेने गोळीबार Firing केलेला आहे. यानंतर ट्रकला आगीच्या हवाले करण्यात आले आहे. स्थानिकांनी याची माहिती दिल्यावर पोलिसांनी Police घटनास्थळी लगेचच धाव घेतली आहे.

पोलिसांना ५ मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळले आहेत. आसाम पोलिसांनी याबाबत माहिती सांगितले आहे की, डिमासा नेशनल लिबरेशन आर्मीच्या Dimasa National Liberation Army (डीएनएलए) उग्रवादी समुहाने हा हल्ला केला असल्याचे वर्तवले जात आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये शोधमोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.

उग्रवाद्यांना पकडण्याकरिता आसाम रायफल्स पथकाचे देखील मदत घेतली जात असल्याचं पोलीस अधिकारी जयंत सिंह यांनी सांगितले आहे. दरम्यान, गुवाहाटीपासून २०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दिमा हसाओ या ठिकाणी ही घटना घडली आहे. आग लावण्यात आलेले, ट्रक सिमेंट तयार करणाऱ्या प्लान्टकरिता कोळसा आणि अन्य सामानाची वाहतूक करत होते, अशी माहिती या घटनेत समोर आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT