या परिस्तिथीला न लढताच पळून जाणारे अशरफ घनी जबाबदार - जो बायडन
या परिस्तिथीला न लढताच पळून जाणारे अशरफ घनी जबाबदार - जो बायडन Saam Tv
देश विदेश

या परिस्तिथीला न लढताच पळून जाणारे अशरफ घनी जबाबदार - जो बायडन

वृत्तसंस्था

काबूल: अफगाणिस्तानवर Afghanistan तालिबानने Taliban कब्जा केल्यानंतर अफगाण राष्ट्रपती अशरफ घनी Ashraf Ghani यांनी आपला जीव वाचवत पळ काढला. यावर आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन Joe Biden यांनी सडकून टीका केली आहे. अशरफ घनी न लढताच पळाले त्यांना याबाबत प्रश्न विचारले पाहिजे, अफगाणिस्तानमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना जबाबदार धरले आहे अशी प्रतिक्रया जो बायडन यांनी व्यक्त केली आहे.अमेरिकेचा मी चौथा राष्ट्रपती आहे ज्याने अफगाणमधील युद्ध पहिले आहे.अमेरिकेने कधीही हार मानली नाही. दहशतवादाविरोधातील हा लढा असाच सुरू राहणार आहे. अमेरिकेने आतापर्यंत खूप बलिदान दिले आहे त्यामुळे आता आमचे सैन्य अजून धोका पत्करु शकत नाही असेही बायडन यावेळी म्हणले आहे.

जो बायडन पुढे म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहोत. तालिबानशी अफगाण सैन्य ही लढू शकत नाही. भ्रष्टाचार ही अफगाण सरकारमध्ये एक मोठी समस्या आहे. अचानक अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बदलली. अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करणे हे आमचे ध्येय कधीच नव्हते. येणाऱ्या दिवसात आम्ही मदत करू.

हे देखील पहा -

जो बायडन यांनी सैन्य मागे घेण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करत म्हणाले की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षांनी अतिशय कठीण निर्णय घेतला. हीच ती वेळ आहे अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्यासाठी इतकी चांगली वेळ कधीच नव्हती. त्यांचा सुरुवातीपासूनच विश्वास होता की अमेरिकेचे काम अफगाणिस्तानातील दहशतवादाशी लढणे आहे, राष्ट्र निर्माण करणे नाही. पण यानंतर तालिबान पुन्हा अफगाणिस्तावर कब्जा करेल असा अंदाज आम्हाला होताच. पण इतक्या लवकर तालिबान अफगाणिस्तावर कब्जा करेल असे वाटले नव्हते, असे जो बायडन स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली आहे. आम्ही अफगाणिस्तानात तीन लाखांची फौज उभी केली होती. ट्रम्पच्या वेळी, अफगाणिस्तानात १५०००० पेक्षा जास्त सैनिक होते आणि तेच आमच्या काळात फक्त दोन हजार सैनिक शिल्लक होते. सध्या घडीला ६००० सैनिक काबूल विमानतळावर पहारा देत आहेत. असे जो बायडन म्हणाले.

आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी बरेच काम केले आणि अध्यक्ष म्हणून मला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. २० वर्षे आमचे सैन्य तिथे लढत होते आणि लोक म्हणतात की आम्ही हार मानली, पण आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. आम्हाला आमच्या जास्त लोकांना मरू द्यायचे नाही. असे देखील जो बायडन यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: स्टेजवर एक अन् खाली एक भाषा नको; पंचायत होईल.. जयंत पाटलांचा विश्वजित कदमांना इशारा

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT