Police detain AAP leader in Vadodara amid serious allegations of rape and blackmail involving obscene videos. saam tv
देश विदेश

बलात्कार प्रकरणी आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्याला अटक; महिलेचे अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेलही करायचा

AAP Leader Physical Assaulte And Blackmail Case In Vadodara Details: वडोदरा येथे आम आदमी पक्षाच्या शहराध्यक्षावर महिलेने लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

Omkar Sonawane

गुजरातच्या वडोदरामधून एक खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथील आम आदमी पक्षाच्या शहर अध्यक्ष अशोक झा याला अटक केली आहे. ओझावर रेप आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या दाखल गुन्ह्याप्रकरणी आम आदमी पक्षाचा शहर अध्यक्ष अशोक झाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताला पक्षात मोठे पद आणि तिच्या नवऱ्याला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

अशोक झा पीडितेला शहरातील विविध हॉटेल्स आणि इतर ठिकाणी घेऊन जात असे आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत असे. पोलीस तपासात अशोक ओझाचा मुलगा, आनंद ओझा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. फिर्यादीत असलेल्या माहितीनुसार, अशोकने पीडितेला पक्षाच्या कामानिमित्त एका हॉटेलवर बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने असा ही आरोप केला आहे की, अशोक ओझाने तिचा मुंबई ते वैष्णोदेवी असा पाठलाग केला. या सगळ्या प्रकरणात तिने संपूर्ण ओझा कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर वडोदराच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून हा ठिकठिकाणी या प्रकरणाची चर्चा होत आहे. दरम्यान नेतेच जर शोषण करत असेल तर सामान्य लोकांनी न्यायासाठी कोणाकडे जायचे असा सवाल नागरिक विचारत आहे. या घटनेचा सखोल तपास वडोदरा पोलीस करत असून कोर्ट काय निकाल देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र हे प्रकरण समजताच आम आदमी पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खान करतोय तिसरं लग्न? तारीखही ठरली, होणारी बायको कोण?

दातदुखी ते पचनक्रिया, रात्री तोंडात लवंग ठेवून झोपण्याचे जबरदस्त फायदे

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का; कोलकाताच्या महापौरांचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra News Live Update: रायगड किल्ल्यावरील व्यावसायिकांनी घेतली महाड प्रांताधिकाऱ्यांची भेट

Cockroach Janata Party चं ६ जूनला पहिलं आंदोलन, मोदी सरकारला धारेवर धरणार; कशी असणार आंदोलनाची दिशा?

SCROLL FOR NEXT