Ashok Kharat Saam tv
देश विदेश

तुझा नवरा मरेल, माझी गर्लफ्रेंड हो; विवाहितेवर २ वर्षे अत्याचार, अशोक खरातचा धक्कादायक कारनामा उघड

Ashok Kharat Case: अशोक खरातने विवाहितेवर २ वर्षे अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. या अशोक खरातचा धक्कादायक कारनामा उघड झाला आहे.

Vishal Gangurde

पोलिसांकडून खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकला

३५ वर्षीय महिलेकडून खरातवर गंभीर आरोप

खरातच्या महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्याने महाराष्ट्र हादरला आहे. लोकांचा चेहरा पाहून भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातने अनेक महिलांचं शोषण केल्याचे उघड झालं आहे. खरात हा एका ३५ वर्षीय महिलेवर मागील २ वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. त्याने महिलेला तुझा नवरा मरेल, माझी गर्लफ्रेंड हो, अशी भीती सांगून महिलेवर अत्याचार करत होता. या महिलेने पोलिसांत धाव घेतल्यानंतर अशोक खरातची कुंडली समोर आली. या अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली.

अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत घनिष्ट संबंध होते. तो राजकीय नेते, सेलिब्रिटींचं भविष्य बघायचा. अनेक राजकीय नेत्यांना अशोक खरातचा आदर वाटायचा. याच अशोक खरातचा कारनामा उघड झाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री घरात घुसून त्याला अटक केली.

पोलिसांनी खरातच्या घरात रात्री चोर घुसल्याचा बनाव करत एन्ट्री केली. त्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी खरातच्या मुसक्या आवळल्या. अशोक खरातला अटक झाल्याचे कळताच त्याचे कुटुंबीय चकीत झाले.

पोलिसांनी अशोक खरातच्या फार्महाऊसवरही देखील छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना अशोक खरातच्या फार्महाऊसवर महत्वाच्या गोष्टी आढळून आल्यात. पोलिसांना त्याच्या संपत्तीचे विविध कागदपत्रे देखील सापडले. फार्महाऊसवर एक पिस्तुल आणि काही जिवंत काडतुसे देखील जप्त केलीत. कोर्टाने अशोक खरातला ७ दिवसांची सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या नराधम खरातने आणखी किती महिलांवर अत्याचार केला का, याचाही तपास पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:इंटरनेट वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क

घराच्या उंबरठ्यावर हळद का लावतात? वास्तु शास्त्र काय सांगते?

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेणार

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT