Rajasthan Assembly Election 2023: PM Narendra Modi On Congress Rajasthan Election 2023 Update - Saam Tv
देश विदेश

Rajasthan Election 2023 : 'राजस्थानमध्ये पुन्हा कधीही गेहलोत यांचं सरकार येणार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Satish Kengar

Pm Narendra Modi Speech in Rajasthan:

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिला आहेत. तीन तिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानचे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावर आहेत. यातच आज राजस्थानच्या सागवाडा डुंगरपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

ते म्हणाल आहेत की, ''जी भूमी मावजी महाराजांच्या अचूक भाकितासाठी ओळखली जाते, तिथे भाजप सरकार येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मावजी महाराजांना वंदन करताना मी एक भाकीत करण्याचे धाडस करत आहे. यावेळीच नव्हे तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार कधीच स्थापन होणार नाही, असा माझा अंदाज आहे. मावजी महाराजांच्या भूमीतून उच्चारलेला शब्द कधीही चुकीचा असू शकत नाही."

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जेथे काँग्रेस मत मागणार आहे, तिथे त्यांना एकच उत्तर मिळत आहे. लोक म्हणत आहेत की, गेहलोत जी तुम्हाला मतं मिळणार नाहीत. आता ही गोष्ट सोशल मीडियावरही खूप गाजत आहे. मुलंही यावर व्हिडिओ बनवत आहेत.'' (Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले, ''हे क्षेत्र काँग्रेसच्या कुशासनाला बळी पडलं आहे. राजस्थानमधील प्रत्येक सरकारी भरतीमध्ये काँग्रेस सरकारने घोटाळे केले आहेत. काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या ओळखीचे असे उद्योग आहेत की, त्यांची मुले अधिकारी झाली. पण तुमच्या मुलांना हाकलून देण्यात आलं. ज्यांनी तुमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केले, त्यांना राजस्थानमधून तुम्ही हद्दपार करा.''

आदिवासींचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काँग्रेसने आदिवासींसाठी कधीच काही केले नाही. भाजपनेच आदिवासींसाठी अनेक कामे केली. तुमचं पशुधन सुरक्षित राहावी यासाठी भाजप सरकार 15 हजार कोटी रुपयांच्या निधीतून जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवत आहे. तुम्हाला आठवत असेल की, याच गेहलोत सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात गुरांसाठी गवत कपणाऱ्यांसाठीचा दंड 500 रुपयांवरून 25 हजार रुपये केला होता. नंतर भाजप सरकारने हा निर्णय बदलला. या गोष्टी विसरू नका."

'आम्ही सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेऊ'

भाजप सत्तेवर आल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेण्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले, “काँग्रेसच्या लुटीमुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे. अनेक महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे शासनाकडे थकीत असल्याचे सांगितले जाते, मात्र सुनावणी होत नाही. पेपर लीकमध्ये काँग्रेसने राजस्थानला आघाडीवर नेहल आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT