Ashok Aliseril Thamarakshan builds Airplane in Lockdown/ Facebook SAAM TV
देश विदेश

कमाल! लॉकडाउनमध्ये घरीच तयार केलं स्वतःचं ४ सीटर विमान; आता अख्खं कुटुंब जगभर फिरतंय

लॉकडाउनच्या काळात केरळच्या अशोक लीसेरिल थमारक्षण यांनी घरीत स्वतःचे विमान तयार केले. आता ते या विमानातून जगभर फिरताहेत.

Nandkumar Joshi

केरळ: कोरोना महामारीमुळं अख्खं जग संकटात सापडलं. अनेकांनी कुटुंबांतील आपली माणसं गमावली. होत्याचं नव्हतं झालं. या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या असतानाच, काहींनी लॉकडाउनच्या काळात काही 'पॉझिटिव्ह' गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. काही यशस्वी झाले. यातून बरेच काही शिकले. (Ashok Aliseril Thamarakshan mechanical engineer from Kerala successfully builds four seater Airplane during Lockdown)

अनेकांना आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यास मिळाला. तर जगभरात अनेकांनी पाककलेत प्राविण्य मिळवले. स्टार्टअप संकल्पनाही बऱ्याच आल्या. याचवेळी एका व्यक्तीने कमाल केली. संकटकाळातही त्यानं पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून घरच्या घरीच आपल्या कुटुंबासाठी चक्क विमान (Plane) तयार केलं. आता या खासगी विमानातून ते कुटुंबीयांसोबत अख्खं जग फिरताहेत.

केरळच्या अशोक अलीसेरिल थमारक्षण यांनी लॉकडाउनमध्ये (Lockdown) मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. त्यांच्या या कृतीनं अख्ख्या जगाला एक सकारात्मक संदेश दिला. विश्रांती किंवा वेळ घालवण्याऐवजी त्यांनी लॉकडाउनच्या काळात बरेच संशोधन केले आणि घरीच विमान तयार केलं.

चार जणे बसू शकतील असे विमान तयार केले. आता या विमानातून ते जगभर भटकंती करत आहेत. याच विमानातून ते अनेक देश फिरत आहेत. जी-दिया असे या विमानाचे नाव असून, त्यांनी त्यांच्या लहान मुलीच्या नावाचे आहे.

घरीच तयार केला 4 सीटर विमान, स्वप्न केले साकार

मूळचे केरळच्या (Kerala) अलाप्पुझा येथील रहिवासी अशोक अलीसेरिल थमारक्षण यांना हे चार आसनी विमान तयार करण्यासाठी जवळपास १८ महिने लागले. लंडनमध्ये त्यांनी हे विमान तयार केले. २००६ मध्ये अशोक हे शिक्षणासाठी यूकेमध्ये गेले होते.

लॉकडाउनच्या काळात ते घरीच होते. त्यांनी घरी राहून वेळ दवडण्यापेक्षा संशोधन केले. त्यांनी स्वतःचे चार आसनी विमान तयार केले. अशोक यांच्यासाठी संशोधन करणे, विमान तयार करण्याची संकल्पना आणि ते प्रत्यक्षात साकार करणे सहजसोपे होते, कारण ते स्वतःच एक परवानाधारक पायलट आहेत. फोर्ड कंपनीत ते काम करतात.

स्वतःचे विमान असावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी जोहान्सबर्ग येथे स्लिंग एअरक्राफ्ट नावाच्या कंपनीच्या कारखान्याचा दौरा केला. २०१८ मध्ये ही कंपनी नवीन विमान लाँच करणार होती हे त्यांना ठाऊक होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या विमानासाठीही एक किट तयार करण्याची ऑर्डरही देऊन टाकली.

अशोक यांनी सांगितले की, जेव्हा कधी कुटुंबीयांसाठी कुठे ये-जा करण्यासाठी प्लेन हायर करत होतो, त्यावेळी दोन आसनीच विमान मिळायचे. त्यांच्या कुटुंबात चार जण आहेत. ते स्वतः आणि पत्नी, दोन मुले असं त्यांचं कुटुंब आहे. चार आसनी विमान मोठ्या मुश्किलीनं मिळायचं. त्यामुळे त्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरवले आणि स्वतःचं चार आसनी विमान तयार करण्याचा निर्धार केला. लॉकडाउनमध्ये त्यांनी विशेष वेळ काढला. आता त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

Mumbai Bar News : मुंबईतील प्रसिद्ध बारमध्ये अल्पवयीन मुलींना दिली दारू, दोघींची प्रकृती खालवल्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT