Asaduddin Owaisi on Atiq Ahmad Case Saam Tv
देश विदेश

Asaduddin Owaisi on Atiq Ahmad Case: यूपीमध्ये बंदुकीच्या जोरावर सरकार चालतेय, ओवैसींनी केली मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याची मागणी

Atiq Ahmad Murder : ओवैसींनी योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे.

Shivani Tichkule

Atiq Ahmad and Ashraf Ahmed Shot Dead: तुरुंगात कैद झालेल्या गुंडातून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पोलिसांच्या उपस्थितीत गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांचाही दोन-तीन जणांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात सध्या या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणावरून विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी याप्रकरणी योगी सरकार आणि पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. 

ते म्हणाले की,  उत्तर प्रदेशातील भाजप सरकार कायद्यानुसार चालत नाही, तर बंदुकीच्या जोरावर चालत. अशा घटनांमुळे लोकांचा संविधानावरील विश्वास कमी होईल. ही संपूर्ण घटना घडली तेव्हा पोलिसांनी एकही गोळी झाडली नाही. मारेकरी तिथे कसे पोहोचले, पोलिसांनी त्यांना का रोखले नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत तपास पथक तयार करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एकाही अधिकाऱ्याचा या संघात समावेश केला नाही तर बरे होईल कारण त्यांच्या उपस्थितीतच या दोघांची हत्या झाली आहे. 

योगींनी राजीनामा द्यावा

यूपी सरकारवर हल्लाबोल करताना ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, या हत्येला दहशतवादाचं नाव देणार नाही, तर काय मारेकऱ्यांना देशभक्त म्हणणार का, त्यांना हार घालणार का? असा सवाल त्यांनी केलाय. याचा उत्तर प्रदेश सरकारशी काही संबंध नाही, तर मग ते कट्टर कसे झाले, त्यांच्याकडं इतकी शस्त्रं कुठून आली? एकाचवेळी गोळ्या झाडल्या जात असून त्यांना कुठंही अडवण्यात आलं नाही. ते मूलतत्त्ववादी आहेत आणि भाजप (BJP) त्यांना संरक्षण देत आहे, असा आरोपही ओवैसींनी केला आहे.

गोळ्या घालून धार्मिक घोषणा कशाला देता. त्यांना दहशतवादी नाही तर काय देशभक्त म्हणणार का? त्यांना फुलांचा हार घालणार का? असा सवाल करत ते म्हणाले, 'जे लोक टीव्ही स्टुडिओत बसून आनंदोत्सव साजरा करत होते, तुम्ही गिधाडं आहात. तिथं पडलेले मृतदेह खा. आज भाजपची सत्ता आहे, उद्या दुसरी कोणाची असेल, हे तुम्ही विसरत आहात.

यूपीच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. काल झालेल्या हत्येची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांच्यात घटनात्मक नैतिकता जिवंत असेल, तर त्यांना पद सोडावे लागेल, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara : नालासोपाऱ्यात शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग | VIDEO

Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Amravati Crime : अमरावतीत फ्लॅटमध्ये सुरु होता देहविक्रचा व्यवसाय; बनावट ग्राहक पाठवून पर्दाफाश, महिलेसह पाच तरुणी ताब्यात

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT