Video: बैठकीमुळे बदललं आयुष्य, जुगारी माणूस झाला व्यावसायिक; समाजात निर्माण केली नवी ओळख

Appasaheb Dharmadhikari News: आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीमुळे अनेकांच्या जीवनात बदल झाला. याचेच उदाहरण म्हणजे महाडमधील प्रवीण उमासरे.
Appasaheb Dharmadhikar News
Appasaheb Dharmadhikar NewsSaam tv
Published On

Appasaheb Dharmadhikari News: आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण कार्यक्रम, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापन, आरोग्य शिबिर, समाज प्रबोधन व बाल संस्कार वर्ग यांसारखे अनेक मोलाचे कार्य दिले आहे. तसेच त्यांनी धर्मजागृतीचा वसा त्यांनी लोकांपर्यंत मांडला.

मानवता हाच धर्म असा लोककल्याणाचा मार्ग त्यांनी समोर ठेवला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीमुळे अनेकांच्या जीवनात बदल झाला. याचेच उदाहरण म्हणजे महाडमधील प्रवीण उमासरे. (Latest Marathi News)

बैठकीला जाण्यास सुरुवात केली आणि वाईट सवयी सुटल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी महाडमधील प्रवीण उमासरे हे एक. पूर्वीचे प्रवीण म्हणजे मटका, झुगाराच्या नादात वाया गेलेला माणूस. पैसा आला की मटका, झुगाराच्या आड्यावर जाऊन खेळायचा मोठा नाद. त्यातच त्यांची नोकरी गेली. हे संकट कमी की काय त्यात पुराच्या पाण्यात बुडून त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाला.

परिस्थिती हाताच्या बाहेर जात असताना प्रविण उमासरे यांना बैठकीचा मार्ग मिळाला. सद्गुरुंचा हात डोक्यावर आला आणि परिस्थिती बदलली. उमासरे यांचे मटका, जुगाराचा नाद सुटला.

उमासरे यांनी महाड येथील चवदार तळ्याजवळ छोटीशी भेळची गाडी सुरु केली. बैठकीमुळे आलेली नम्रता, समोरच्यांसोबत आदबीने, प्रेमाने बोलण्याची पद्धत यामुळे व्यवसाय वाढला. आज प्रवीण आपली पत्नी शोभा आणि मुलगा प्रितम यांच्या मदतीने भेळ, पाणी-पुरी, चाट आणि कच्ची दाबेलीची गाडी चालवतात. त्यांची पूर्वीची ओळख आता बदलली असून एक प्रतिष्ठित व्यवसायिक म्हणून ते उभे आहेत. प्रवीण उमासरे यांच्या सारखे अनेक उदाहरणे समाजात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com