Uttar Pradesh News : यूपी एसटीएफने माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद याला चकमकीत ठार केले आहे. असद हा उमेश पाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. याशिवाय शूटर गुलामलाही यूपी एसटीएफने चकमकीत ठार मारले आहे.
यूपी एसटीएफच्या म्हणण्यानुसार, माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात फरार होते. त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशी येथे ही चकमक झाली असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
उमेश पाल बसपा आमदार राजू पाल यांच्या खून प्रकरणातील साक्षीदार होते. 24 फेब्रुवारीला न्यायालयातून घरी परतत असताना त्यांच्या घरासमोर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी अनेक गोळ्या उमेश पाल यांच्यावर झाडल्या.
तसेच हल्लेखोरांनी बॉम्ब हल्लाही केला होता. ज्यात उमेश पाल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला पोलीस कर्मचारी संदीप निषाद यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक पोलीस कर्मचारी राघवेंद्र गंभीर जखमी झाले होते, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.