VIRAL VIDEO
VIRAL VIDEO Saam TV
देश विदेश

VIRAL VIDEO:महिलेच्या हट्टापुढे रेल्वे चालकानेही मानली हार; एसी ट्रेन खचाखच भरल्याने इंजीन डब्ब्यातून केला प्रवास

साम टिव्ही ब्युरो

VIRAL VIDEO: ऑफिसच्या वेळेत सर्वच लोकल ट्रेन खचाखच गर्दीने भरलेल्या असतात. अशात अनेक मार्गांवर आता एसी ट्रेन देखील धावतात. मात्र सकाळी आणि सायंकाळी एसी ट्रेनमध्ये देखील पाय ठेवायला जागा नसते. अशात सोशल मीडियावर एका महिला प्रवासीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एसी ट्रेन पूर्ण भरलेली आहे. मात्र तरी देखील महिला याच ट्रेनने प्रवास करण्यासाठी हट्टाला पेटली आहे. अखेर महिलेच्या हट्टपुढे रेल्वे पायलटने देखील हार मानली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एसी ट्रेनमध्ये गर्दी झाल्याने ट्रेनचे(Train)दरवाजे बंद होत नाहीत. त्यामुळे महिला पोलीस आणि रेल्वे पायलट महिलेला खाली उतरायला सांगतात. मात्र ही महिला खाली उतरून दुसऱ्या ट्रेनने प्रवास करण्यास नकार देते. महिला पोलीस तिला खाली उतरण्याची विनंती करते मात्र ती काहीही ऐकूण घ्यायला तयार नसते. त्यामुळे या महिलेने रेल्वे चालक थेट पायलट कंपार्टमेंटमध्ये (इंजिन डब्बा) बसून प्रवास करण्याची विनंती करतात आणि महिला देखील तिथे बसून मस्त प्रवास करताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यात काही जण या महिलेच्या हट्टाचे कौतुक करत आहेत. तर काहींनी तिच्यावर आणि रेल्वे पायलटवर टीका केली आहे. रेल्वेच्या इंजिन डब्ब्यातून प्रवास करता यावा असा विचार तुमच्याही मनात कधी ना कधी आलाच असेल. मात्र प्रत्येकाला अशी संधी मिळणे शक्य नाही.

मात्र महिलेच्या हट्टामुळे तिला ही संधी मिळाल्याने काही नेटकऱ्यांनी आता आम्ही देखील असे करणार म्हणजे आम्हाला सुद्धा इंजिनमधुन प्रवास करता येईल, अशा कमेंट केल्या आहे. सदर व्हिडिओ एका ट्वीटर( Tweet) अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

Amol Mitkari On Sharad Pawar: तुमच्या मनात नेमकं काय होतं?, शरद पवारांच्या त्या विधानावर अमोल मिटकरी संतापले

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SCROLL FOR NEXT